Thursday, 13 April 2023

"आनंदाचा शिधा"मुळे सणांचा आनंद द्विगुणीत झाला - शामा सदावर्ते !

"आनंदाचा शिधा"मुळे सणांचा आनंद द्विगुणीत झाला - शामा सदावर्ते !

छत्रपती संभाजीनगर, अखलाख देशमुख‌, दि. १३  : -  शासनाने 'आनंदाचा शिधा ' दिल्यामुळे आम्हाला अत्यंत कमी किंमतीत साखर, रवा, तेल आणि चणाडाळ मिळाली. राज्य शासनाने सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत लाभार्थ्यांना दिलेल्या आनंदाचा शिधा या उपक्रमामुळे आमचा सणाचा आनंद द्विगुणीत झाला. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह यंत्रणेचे आभार मानते. अशा भावना औरंगाबाद येथील श्रीमती शामा सदावर्ते यांनी व्यक्त केल्या.

  अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा व इतर योजनेच्या लाभार्थ्यांशी आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्हीडीओ कान्‍फरसिंगद्वारे संवाद साधला, यावेळी श्रीमती शामा सदावर्ते  बोलत होत्या. 

  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होणे, याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे तसेच रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, पुरवठा उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांच्यासह पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील आनंदाचा शिधा संच, शिवभोजन थाळी या योजनांचा लाभ घेतलेले  लाभार्थी उपस्थित होते. 

*शिवभोजन मध्ये चांगले जेवण मिळते - पूजा पंडित*

यावेळी शिवभोजन योजनेचे शहरातील लाभार्थी श्रीमती पूजा पंडित यांच्याशीही मुख्यमंत्री महोदयांनी संवाद साधला. यावेळी बोलतांना श्रीमती पंडित म्हणाल्या, माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. अनेकदा दुपारी जेवायला घरी जात येत नसल्याने  शिवभोजन योजनेतंर्गत भोजन करते  जेवणाचा दर्जाही चांगला असतो. वरण, भात, भाजी, पोळी उत्तम असते त्यामुळे मी नियमित येथे भोजन करते असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ;  उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!! ठाणे...