Thursday, 13 April 2023

सिल्लोड शहरातील बाजार पेठ उशिरा पर्यत शुरु ठेवावी !

सिल्लोड शहरातील बाजार पेठ उशिरा पर्यत शुरु ठेवावी !  

सिल्लोड, अखलाख देशमुख, दि १३ : सध्या मुसलीम समाजाचा पविञ रमजान महिना शुरु आहेत. या महिन्यात मुसलीम समाज महिना भर उपवास ठेवतात.संध्याकाळी उपवास सोडवितात व त्यानंतर तरावीची नमाज पडतात हि नमाज उशिरा पर्यंत चालते. सिल्लोड शहर हे मोठ्या बाजार पेठेचे ठिकाण आहेत. सिल्लोड शहरात तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात लोक खरीदीसाठी संध्याकाळी येतात परंतु पोलिस प्रशासन राञी 11 वाजेलाच सिल्लोडचा मार्केट बंद करत आहेत, यामुळे ईदची खरिदी साठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होत आहेत व लोकांमध्य भितीचे वातावरण तयार होत आहे. 

सध्या ईद मुळे व्यापारी लोकांनी आपल्या दुकानात लाखोचा माल भरुन ठेवला आहेत.बाजार पेठ लवकर बंद होत असल्यामुळे व्यापारी वर्गाला आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहेत. सिल्लोड शहरातील बाजार पेठ उशिरा पर्यत शुरु ठेवावी या मांगणीचे निवेदन सिल्लोड शहर पोलिस निरिक्षक शेषराव उध्दार यांना विविध पक्ष संघटने तर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी जामा मस्जिदचे सदर शेख पाशु चचा, मा.नगरअध्यक्ष बनेखाँ पठाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे  तालुका सचिव सय्यद अनिस, काँग्रेसचे कैसर आझाद, जमियत उल्माचे अध्यक्ष हाफीज नजीर, जमियत उल्माचे सचिव गुलाम हुसेन देशमुख, वकील संघाचे अँण्ड अनिस अहेमद, अँण्ड नसीम अहेमद, जमाते इस्लामीचे डाँ.शेख शकील, मजलीस ए उल्माचे अख्तर कुरैशी, नगरसेवक मोईन पठाण, साहेब खाँ पठाण, हाजी हक्कानी, शेख निसार, सय्यद नासेर, शकील नेवडा, शेख नईम आदी हाजर होते.

No comments:

Post a Comment

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार?कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर, नागरिक संतप्त !**

प्रशासनाच्या आशीर्वादाने वनविभागात बेकायदेशीर कारभार? कल्याण तालुक्यातील बेपर्वा व निर्ढावलेल्या अधिकाऱ्यावर , नागरिक संतप्त !** ...