" द केरला स्टोरी " सिनेमाच्या निर्मत्याला भर चौकात फाशी द्यायला हवी - जितेंद्रा आव्हाड
राष्ट्रवादी "लव जिहादचे "समर्थन करणार का ?--किरीट सोमय्या.
भिवंडी, दिं,९, अरुण पाटील (कोपर) :
'द केरला स्टोरी' चित्रपटावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप आपण पाहत आहोत. आपल्या आयाभगि नींची बदनामी करणाऱ्या " द केरला स्टोरी " चे निर्माते यांना फाशी दिली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा मी निषेध करीत आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून " द केरला स्टोरी " चित्रपटावरून वातावरण तापले आहे. बरेच राजकीय नेते यात वैयक्तिक रस दाखवत आहेत. द केरला स्टोरी या चित्रपटावरून जितेंद्र आव्हाड यांनी संबंधित चित्रपटाच्या निर्मात्यांना फाशी द्यावी अशी मागणी केल्यानंतर आक्रमक झालेल्या किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेस लव जिहादचे समर्थन करते का? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या चित्रपटावर कोणीही बंदी घातली तरी आपण हा चित्रपट पुन्हा एकदा पाहणार असल्याचे, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी द केरला स्टोरी या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना फाशी देण्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमय्या म्हणाले की, मुस्लिम मतांसाठी आपण " लव्ह जिहाद " आणि आतंकवाद याचे आपण समर्थन करणार का ? हा माझा शरद पवार उद्योग आणि महाविकास आघाडीला प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली आह.राष्ट्रवादी काँग्रेस लव जिहादचे समर्थन करते का? तसेच चित्रपटावर कोणीही बंदी घातली तरी आपण हा चित्रपट पुन्हा एकदा पाहणार आहोत - भाजप नेते किरीट सोमय्या
दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी " द केरला स्टोरी " या चित्रपटावर बंदी घातली आहे. ममता बॅनर्जी यांच्या या कृतीचा आपण निश्चित करतो आणि आज पुन्हा एकदा घाटकोपरच्या द ओरियंट येथे हा सिनेमा पाहणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच याआधीही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून टीका केली. केरळच्या नावाने प्रदर्शित झालेला चित्रपट हा खोटारडेपणाच्या परमोच्च स्थानावर आहे, असे त्यांनी ट्विट केले होते.
No comments:
Post a Comment