मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाने कोणाची समृद्धी व कोणाचे वाटोळे, शेरे गावातील ख-या नुकसानग्रस्तांची तुंटपूंज्या मदतीवर 'बोळवण,महसुल अधिकारी व कंपनी ठेकेदाराकडून दादागिरी ?
कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र शासनाचा महत्त्वकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या निर्मिती ने नक्की कोणाची समृद्धी साधणार आहे व यामुळे किती स्थानिकांचे वाटोळे होणार आहे हे सांगता येत नाही. कारण शहापूर तालुक्यातील शेरे गावातील बौध्दवाडा व आदिवासीवाडीतील ग्रामस्थांचे घंराचे, शौचालयाचे ,समाजहॉलचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना कंपनी व्यवस्थापणाने मात्र या ख-या नुकसान ग्रुस्ताची अंत्यंत 'तुटपूंज्या, मदतीवर बोळवण केली आहे. तर दुसरीकडे ज्याचें काही नुकसान झाले नाही अशा वशिलेबाजावर मात्र कंपनी भलतीच मेहरबान झाल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत काही विचारायला गेले, तक्रार केली तर महसूल अधिकारी व कंपनी ठेकेदाराकडून पोलिस बळाचा दबाव आणला जात असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणें आहे.त्यामुळे हा 'विकास की भकास,याचा, विचार व्हायला हवा.
हिंदूहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग हा १२० मीटर रुंदीचा व ७०१ किलोमीटर लांबीचा महामार्ग १० जिल्ह्यातून, २६ तालुक्यातून आणि ३९० गावातून जात आहे. ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यात या महामार्गाला प्रखर विरोध झाला होता. आता शहापूर तालुक्यातील शेरे गावात विरोध वाढत आहे. समृद्धी महामार्गावर डोंगर टेकड्या फोडण्यासाठी भंयकर ब्लास्टिंग केले जाते आहेत. या मार्गापासून १०० ते २०० मीटर अंतरावर असलेल्या गावातील आदिवासी वाडी व बौद्धवाडा येथील लोकांच्या घरांचे, शौचालयाचे समाजहाँल व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेरे बौद्धवाडा येथील ग्रामपंचायत सदस्य सविता पंडित यांनी या विरोधात प्रखर लढा उभारला होता. यावेळी ही पोलीस बळाचा वापर झाला होता. अखेरीस नुकसान ग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते.
परंतु एकूण ५० लोकांना कोणाला, ६ हजार, ७ हजार तर कोणास १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली होती. यामध्ये ही ज्यांची घरे महामार्गापासून १ते दिड किलोमीटर अंतरावर आहेत अशा एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्ते ना मदत देण्यात आली आहे. परंतु जे प्रत्यक्षात आदिवासी वाडी व बौध्दवाडा येथील नुकसान ग्रुस्त आहेत, त्यांना मात्र मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
या बाबतीत तक्रार वाढत गेल्यानंतर या मार्गाच्या उपजिल्हाधिकारी सीमा पाटील यांनी या वाड्यात भेट दिली. याप्रसंगी केवळ महिलांना प्रश्न व अडचणी मांडण्याच्या सूचना दिल्या. परंतु उपस्थित पुरुषांना बोलण्यास मज्जाव केला. त्यामुळे या नक्की हा प्रश्न सोडवण्यासाठी आल्या होत्या की आपला दबाव निर्माण करण्यासाठी हे कळत नव्हते. यानंतर पुन्हा २८ ग्रामस्थांची यादी जाहीर करण्यात आली. पण यामध्ये ही विजय मंगल पंडित, वंदना पंडित, शांताबाई जाधव, गौतम उबाळे, भगवान उबाळे, संदेश उबाळे, रमेश उबाळे, कासुबाई गवाळे, प्रभाकर गवाळे, सोमनाथ गवाळे, आणि जगदीश धनगर, आदी ची नावेच नाहीत. शिवाय समाज हाँल चे नुकसान झाले आहे त्याचाही कुठेही उल्लेख नाही.
तथापि ज्या २८ लोकांची यादी देण्यात आली आहे. ते जोपर्यंत एकत्र येणार नाहीत तोपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही असे कंपनी ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. म्हणजे ज्याला अधिक गरज आहे त्याला इतरासाठी थांबावे लागणार आहे. येथील किशोर पंडित यांचे शौचालय पुर्ण पणे उखडले आहे, लाद्या, टाकी फाटली आहे, त्यांना ती दुरुस्ती करायची आहे. मात्र वरील अटीमुळे त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. म्हणजे खरेच नुकसान होऊनही यांच्या मागे चकरा मारायच्या हा कोणता "विकास"
आजच दुपारी १२:४५ वाजता आदिवासी वाडीच्या मागे भयंकर ब्लास्टिंग करण्यात आला. यावेळी कोणत्याही प्रकारची अनाऊसमेंन्ट किंवा सूचना दिल्या नाहीत. याचा जाब विचारण्यासाठी बेबीबाई मुकणे, मनिषा वाघे, मनिबाई पवार या आदिवासी महिला गेल्या असता आम्ही ब्लास्टिंग करणार, पोलिसांचे सरंक्षण आम्हाला आहे, असे मगुरीचे उत्तर त्यांना देण्यात आले. आम्ही, आमची मुले कधीही वेळी अवेळी मागे जातो या ब्लास्टिंग मुळे कोणाचा जीव गेला तर याला कोण जबाबदार असे बेबी मुकणे हिचे म्हणणे आहे. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग नक्की कोणासाठी व कोणाच्या समृध्दी साठी हे स्पष्ट होते. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी सीमा पाटील यांना वारंवार संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
तर या विरोधात प्रांरभी मी अंदोलन केले मात्र जेव्हा मदतीचे वाटप करण्याची वेळ आली तेव्हा मला विश्वासात घेतले नाही, संगणमत करून वाटप केले त्यामुळे लोकांचा रोष वाढला असे शेरे ग्रामपंचायत सदस्य सविता पंडित यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment