छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त औरंगाबादेत उत्सवाचे आयोजन !
*शालेय विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवला जाणार*
औरंगाबाद, अखलाख देशमुख १० :
छत्रपती संभाजी महाराज जयंती औरंगाबादेत विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार असून दिनांक ११,१२,१३ व १४ मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
दिनांक ११ मे रोजी प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे नक्षत्रवाडी व बजाजनगर येथे भव्य असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यान होणार आहे.
१३ मे रोजी सकाळी ०९:३० वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावरील गरुडझेप हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.तसेच सायंकाळी ०५:०० वाजता क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते टीव्ही सेंटर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत मशाल रॅली काढण्यात येणार आहे.
तर १४ मे रोजी सकाळी १०:०० वाजता टीव्ही सेंटर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार असून सायंकाळी ५:०० वाजता जळगाव रोड जवळील शरद हॉटेल पासून ते संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक येथील शंभुनाथ वाद्य पथक मुख्य आकर्षण असणार आहेत.
No comments:
Post a Comment