कुणबी समाज तळवडे विभाग तर्फे जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन !
मुंबई - ( दिपक कारकर )
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई,शाखा तालुका म्हसळा,अंतर्गत तळवडे विभाग आणि पश्चिम विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि.१३ मे २०२३ रोजी पूर्ण दिवसभर जनजागृती अभियान राबाविण्यात येणार आहे. तळवडे विभागातील केल्टे गावापासून सुरु करून नंतर जांभूळ, पानवे, कोंझरी, कुंभळे, तळवडे, कोळे, आडी वरची वाडी, आडी बंदर वाडी गावी भेट देऊन समारोप आडी मधली वाडी या गावी करण्यात येणार आहे.
या दौऱ्या दरम्यान तळवडे विभाग मुंबई अध्यक्ष श्री मनोज काप, सचिव श्री रुपेश भोगल तसेच पश्चिम विभाग ग्रामीण अध्यक्ष श्री गणेश बोर्ले, सचिव श्री महेंद्र धामणे यांच्या नेतृत्वात प्रत्येक गावातील ग्रामस्थना भेट देऊन कुणबी समाज्याच्या एकजुटीसाठी, भविष्यातील कुणबी समाज कसा असावा, नविन पिढीला शैक्षणिक, समाजिक, राजकीय क्षेत्रात सक्षम असा कुणबी समाज करण्याच आवाहन करणार आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आपण कुठे पाठी राहू नये हे पटवून देण्यासाठी तळवडे विभाग हे जनसंपर्क अभियान राबवत आहे.
त्या निमित्ताने तालुका उपाध्यक्ष श्री मनोहर पाटील तसेच विभागीय सल्लागार श्री राजू धाडवे आणि सदानंद पाकड यांचे मार्गदर्शन ही मिळणार आहे. या दौऱ्यात १० गावातील जास्तीत जास्त समाज बांधव आणि युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हया उपक्रमात विभागातील अनेक तरुणांनी सहभागी व्हावे,असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
खूप छान सामाजिक कार्यक्रम
ReplyDeleteछान उपक्रम हाती घेतला आहे समाजाच्या कार्यक्रंमापेक्षा हे महत्वपुर्वक घटक आहे आपल्या जणजाग्रृती अभियांना हार्दिक शूभेच्छा..!
ReplyDelete