Wednesday, 10 May 2023

कोतळूक बाधवटेवाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

कोतळूक बाधवटेवाडी आयोजित श्री सत्यनारायण महापूजा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

[ निवोशी/गुहागर - उदय दणदणे ]

        गुहागर तालुक्यातील कोतळूक (बाधवटे वाडी) येथे सोमवार दिनांक ०८ मे २०२३ रोजी नवतरुण मित्र मंडळ व झुंजार महिला मंडळ बाधवटे वाडी आयोजित श्री सत्यनारायणाची महापूजा विविध कार्यक्रमानी मोठ्या थाटामाटात पार पडली. सदर भव्यदिव्य अशा सोहळ्यासाठी गोमंतक बोर्डिंग हाऊस दादर (मुंबई) येथील राहणारे दानशूर व्यक्तिमत्त्व व हॉटेलचे मालक तसेच उद्योजक सुधीर शेठ बोरकर व सुनील शेठ बोरकर यांचं प्रतिवर्षी प्रमाणे  बहुमोल मार्गदर्शन तसेच महाप्रसादासाठी चा संपूर्ण खर्च बोरकर बंधू यांच्या माध्यमातून करण्यात आला.      
       नवतरुण मित्र मंडळ (बाधवटे वाडी) कोतळूक हे मंडळ  सामाजिक क्रीडा शैक्षणिक असे अनेक उपक्रम राबवत असते. त्यामधील पहिला उपक्रम  मनोरंजनात्मक खेळ त्यामध्ये महिला, लहान मुले, वरिष्ठ मंडळी, अगदी हुरूरने सहभागी होत असतात.
       सदर कार्यक्रमाला  बाधवटे वाडी (वाडी प्रमुख ) तुकाराम बाधवटे, पांडुरंग बाधवटे, रामचंद्र बाधवटे, मधुकर बाधवटे वसंत बाधवटे, बाधव टेवाडीतील भूमिपुत्र व आदर्श शिक्षक सुनील वाघे सर, अनिल कावणकर, युवराज कावणकर ,महिला अध्यक्ष अवंतिका बाधवटे रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या - नेत्रा ताई ठाकूर  तसेच गुहागर पंचायत समिती माजी सभापती विलास वाघे, कोतळूक गाव सरपंच  मोहिते मॅडम, ग्रामपंचायत सदस्य-असावरी बाधवटे तसेच जि .प. प्राथमीक आदर्श शाळा कोतळूक नंबर -५ च्या उपशिक्षिका खामकर मॅडम, पोलीस पाटील अनुजा वाघे, अशी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांची उपस्थिती लाभली.
        महेंद्र बाधवटे यांच्या अध्यक्षतेखाली  वरिष्ठ मंडळी, तसेच शाळेतील शिक्षक व मुलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार कावणकर व गणेश कावणकर यांनी केले. पूजे निमित्त नवविकास नमन मंडळ आबिटगाव दत्तवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी यांचं मनोरंजनात्मक कार्यक्रम कोकणची बहुप्रिय लोककला नमन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
   सदर सोहळा यशस्वी होण्यासाठी ग्रामीण कमिटी अध्यक्ष- विजय बाधवटे, उपाध्यक्ष- प्रकाश बाधवटे, खजिनदार- विनोद कावणकर, नरेश कावणाकर, सुरेश कावणकर, सेक्रेटरी - अजय बाधवटे, यशवंत कावणकर तसेच महिला कमिटी अध्यक्ष- अवंतिका बाधवटे, आसावरी बाधवटे, सेक्रेटरी- नंदिनी कावणकर, विप्लेषा कावणकर, खजिनदार- मानशी वाघे,
मुंबई कमिटी अध्यक्ष -महेंद्र बाधवटे, अनिल कावणकर, सेक्रेटरी - युवराज कावणकर, तुषार कावणकर, खजिनदार - योगेश कावणाकर, संदीप बाधवटे तसेच लाईट व्यवस्थापक- प्रदीप कावणकर  यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाल्याबद्दल उपरोक्त मडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...