Wednesday, 10 May 2023

बहुत हुए भाजप के लाड !! अब बदलो उसकी सरकार !! - कॉम्रेड अमृत महाजन

बहुत हुए भाजप के लाड !! अब बदलो उसकी सरकार !! - कॉम्रेड अमृत महाजन

(घोडगाव) ता. चोपडा, प्रतिनिधी... तालुक्यातील घोडगाव येथे कॉ. सुदामा रजाळे यांच्या अध्यक्षतेखाली हितचिंतक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल भाकप नेते कॉ अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की *दिल्लीचं भाजप-आरएसएस चे केंद्रीय सत्ता आता घालवण्याची पाळी आलेली आहे* कारण 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपाने जनतेला अच्छे दिन आने वाले है; काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या अकाउंटवर 15 लाख रुपये सहज पडतील... अशा थापा  मारून  सत्तेवर आले पण गेल्या नऊ वर्षाचा कारभार हा महिला वर्ग अल्पसंख्यांक विरोधी, जनता, कामगार, शेतकरी विरोधी राहिलेला आहे आणि दुसरीकडे भारताच्या संविधानावर हल्ले सुरू आहेत म्हणून बहुत हो गये भाजपके लाड अब बदलो मोदी सरकार !! हे सांगण्याची पाळी आली आहे. असे आवाहन कॉम्रेड महाजन यांनी केले. ते पुढे म्हणाले, मोदी सरकारचे काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देऊ शकले नाही. उलट बी बियाणे औषधे यांच्या किमती वाढवत असतात. शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे. महागाई ने कळस गाठला आहे. कामगारांना कामाची  शाश्वती नाही. जागतिक बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. पण त्याचा फायदा जनतेला नाहीये. बेरोजगारी वाढलेली आहे या विरुद्ध उठणाऱ्या जनतेला मोदी सरकार धर्माची नशा  देत आहे. खासदार ब्रिजभूषण शर्मा यांची पाठराखण करत असतात. पण त्यांचे विरुद्ध कुस्तीगीर महिला पंधरा दिवसापासून आंदोलन करीत आहेत "दहा वर्षात तुमचे भरपूर कौतुक झाले आता सत्तेवरून हटवा, असे आवाहन काँ अमृत महाजन यांनी आपल्या भाषणाचे समारोपात केले 14 एप्रिल 2023 ते 15 मे 2020 काळात भारतभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ही मोहीम सुरू केली आहे, त्या निमित्ताने घोडगाव गावी ही सभा झाली त्यावेळी इरफान मणियार, शामदास भील, सुदाम रझाळे, विश्वास पाटील, बाळू कोळी, कोळी लक्ष्मण कोळी, सुरेश  कोळी, दीपक कोळी, जयेश पाटील, शिरसाट, छोटू भाई तेजाराम, भोई धुडकू कोळी, रावसाहेब कोळी, मोहम्मद मिस्त्री, पुंडलिक कोळी, वसंत पाटील आदी कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...