जितेंद्र आव्हाड यांच्या वर कायदेशीर कारवाई केली जाईल - देवेंद्र फडणवीस
अरूण पाटील, भिवंडी (कोपर) दि. १०
'द केरला स्टोरी' या चित्रपटावरून देशभरात वादविवाद सुरू आहे. काही ठिकाणी या चित्रपटाचं समर्थन केलं जात आहे. तर काही ठिकाणी या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाबद्दल खळबळ जनक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चित्रपट निर्मात्याला फासावर लटकवलं पाहिजे या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड जर असं काही बोलले असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. या प्रकारचं बोलणं बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. त्यांचे हे वक्तव्य तपासून पाहिलं जाईल. त्यामध्ये काहीही कायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'
No comments:
Post a Comment