Thursday, 11 May 2023

सत्तर वर्षानंतर आंबेमाळी वाडितील आदिवासींचे डोळे नव्या रस्त्याकडे, फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश !

सत्तर वर्षानंतर आंबेमाळी वाडितील आदिवासींचे डोळे नव्या रस्त्याकडे, फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश !

कल्याण, (संजय कांबळे) : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटात वसलेल्या आंबेमाळी या आदीवासी वाडिच्या रस्त्याचे काम अखेरीस ७० वर्षानंतर सुरू झाले असून या नव्या रस्त्याकडे येथील जनता डोळे लाऊन बसली आहे. याचे श्रेय फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीला व त्यांनी केलेल्या प्रयत्ना द्यायला हवे.

कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाटात फांगुळगव्हाण ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायत मध्ये फांगुळगव्हाण, आंबेमाळी, सावर्णे, थितबी, साकारवाडी आणि निर्गुडपाडा आदी गावाचा समावेश आहे. यातील आंबेमाळी या ५० लोकवस्तीच्या गावास गेली ७० वर्षे रस्ता नव्हता, रस्त्याच्या अभावी येथील लोकांना डोलीतून प्रवास करावा लागत होता. अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, आणि ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी वनहक्क दावे मंजुरी साठी वनविभाग,वन अधिकारी, यांच्या कडे सतत व सातत्याने पाठपुरावा केला. व याला यश येवून आता चिंचवाडी ते आंबेमाळी या अडीच ते तीन किलोमीटर अंतर रस्त्याचे काम सुरू झाले आहे.पेसा अंतर्गत निधीतून हे काम सुरू केले आहे.

त्यामुळे गेली कित्येक वर्षांपासून रस्त्याविना अनेक अडचणी, समस्या, प्रश्न यांना तोंड देणारे येथील आदिवासी विद्यार्थी, महिला, पुरुष यांना रस्ता मिळणार आहे, केवळ पाण्याची टंचाई या भागात असून तीही लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी सांगितले.
हे काही असलेतरी येथील आदिवासी मुलं मात्र रस्त्याकडे डोळे लावून बसले आहेत. कुतूहलाने ऐवढे नक्की.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...