Sunday, 7 May 2023

तेलंगणा राज्यातील रयत बंधू ; आणि रयत विमा योजनाची *देशभर* *चर्चा....‌‌ *माजी खासदार हरिभाऊ राठोड*

तेलंगणा राज्यातील रयत बंधू ; आणि रयत विमा योजनाची *देशभर* *चर्चा....‌‌ *माजी खासदार हरिभाऊ राठोड* 

            के.सी.आर सरकारच्या नेतृत्वातील तेलंगणा राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी रयत बंधू म्हणजेच दहा हजार रुपये अनुदान प्रति एकर प्रतिवर्षी शेतकऱ्यांना दिले जाते आणि रयत विमा योजना म्हणजे कुठल्याही कारणास्तव शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास रुपये पाच लाख विमा ची रक्कम दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात जमा केली जाते. 

            के .सी. आर सरकारची ही स्वप्नपूर्ती योजना इतकी लोकप्रिय झाली आहे की, केंद्र सरकारच्या दक्षिण विभागीय कॉन्सिलच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या योजनेची चर्चा झाली आहे, ही योजना देशभर इतर राज्यात लागू करता येईल का ? या संदर्भात पुढील महिन्यात पुढील झोनल मीटिंगमध्ये चेन्नई येथे चर्चेला हा विषय येणार असल्याची माहिती मिळत आहे, तेलंगणा राज्याच्या मुख्य सचिव के.शांती कुमारी यांनी या योजनेचे प्रेझेंटेशन (प्रात्यक्षिक) बैठकीमध्ये मागच्या शुक्रवारी दिले, तेलंगणा हैदराबाद येथील नवीनच बांधलेल्या डॉ. बी. आर .आंबेडकर सचिवालयातील एका बैठकीमध्ये स्थायी समितीच्या समोर सादरीकरण केल्यानंतर चर्चे मधून ही बाब पुढे आली आहे, तेलंगणा सरकारने ही योजना यशस्वीपणे राबवल्यामुळे इतर राज्यांनी या योजनेची अनुकरण का करू नये? अशी चर्चा तेलंगणा सरकारच्या अधिकारीवर्गामध्ये आहे. अशी माहिती भारत राष्ट्र समितीचे ज्येष्ठ नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.

हरीसिंग राठोड
9920716999.
8169020277.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...