Wednesday, 3 May 2023

जिजाऊने दिली शिगाव-खुताड ग्रामपंचायतच्या वाचनालयाला ७६ पुस्तके !

जिजाऊने दिली शिगाव-खुताड ग्रामपंचायतच्या वाचनालयाला ७६ पुस्तके !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र अध्यक्ष संस्थापक निलेश जी भगवान सांबरे साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १४ वर्षांपासून कोकणातील पाचही जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेती, रोजगार क्षेत्रात काम करते आहे. शिगाव - खुताड ग्रामपंचायतीच्या वाचनालयामध्ये पुरेशी पुस्तके उपलब्ध नाही हे समजताच तेथील ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे जेणेकरून गावातील शिक्षणाचा दर्जा उंचावेल ह्या हेतूने आज बोईसर येथील शिगाव-खुताड ग्रामपंचायतीच्या वाचनालयात शैक्षणिक, वैचारिक बुद्धिमत्ता वाढवाणाऱ्या ७६ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या मार्फत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आभार मानण्यात आले. ह्यावेळी जिजाऊ संघटना बोईसर विभाग अध्यक्ष-नरेश प्रकाश धोडी, उपाध्यक्ष महेंद्र नामदेव मोरे, जिजाऊ सदस्य जयेश प्रकाश पाटील, हर्षल पाटील, साजिद शेख, पंकज गवळी व शिगाव- खुताड ग्रामपंचायत सरपंच - दिप्ती सुमडा, उपसरपंच- राहुल हारके व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...