औरंगाबाद शहाराचे जर नामांतरण करायाचेच आहे तर मलिक अंबराबाद करन्यात यावे...
*महानगर पालिका मुख्य इमारतिल टाउन हॉल ला मलिक अंबर स्मारक म्युजियम बनविण्यात यावे.*
****मलिक अंबर इतिहासातील सोनेरी पान
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि.१३ मे : अजिंठा -वेरूळ लेण्या कधी बांधण्यात आल्या, त्यांच्या कारागिरांबाबत जास्त चर्चा होत नाही, इतिहासाचा उलगडा करताना युद्धांचाच अधिक रस जाणवतो, पण मलिक अंबर यांनी नहर, बांधकाम सर्वांना सोबत घेऊन केलेले कार्य सर्वच पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे विचारमंथन करण्यात आले.
औरंगाबाद आणि अहमदनगरचा संस्थापक आणि निर्माता असलेल्या मलिक अंबर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिल्कमिल कॉलनीत आयोजित गुजगोष्टीत इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी, नागरिक, वकील, सरकारी अधिकारी अशा बहुविध क्षेत्रातील नागरिकांच्या उपस्थितीत इतिहास आणि भावी पिढ्यांसाठी करावयाचे कार्य याबाबत सखोल विचारमंथन झाले.
रीड अन्ड लीड फाऊँडेशन औरंगाबाद आणि मलिक अंबर प्रतिष्ठान च्या वतिने अधुनिक महाराष्ट्र चे खरे सिल्पकार मलिक अंबर चा ३९८ वा स्मृति दिन साजरा करण्यात आला..
इतिहास तज्ज्ञ मिर्झा अस्लम बेग, मलिक अंबर यांचे १६ वे वंशज ॲड अत्ताऊरहमान अंबरी, माहिती अधिकारी यशवंत भंडारे, संजय बोरूडे, प्रा. ग. ह. राठोड, भास्कर सरोदे, शाहू पाटोळे, डॉ. जाकीर पठाण, मलिक अंबर यांच्या अभ्यासक इरफाना फातिमा, शेख शब्बीर, अब्दुल बिलाल, मोहंमद नईम, सृजन पाटोळे, शेख इब्राहीम, अश्रफ पठाण, काजी शकील अहमद, मोहमद तय्यब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिर्झा कय्युम नदवी यांनी केले.
ॲड अत्ताऊरहमान अंबरी यांनी मलीक अंबर यांनी खडकी हे शहर वसविले, या युगात ते शक्य नाही, मी एकटाच त्यांचा वारस नसून त्यांच्या कार्याचा गौरव वाढवित "नहरका पाणी शहरतक" असा संकल्प केला जावा, नहरींचे पाणी शहरातील तीस ते चाळीस टक्के जनतेला पुरवता येऊ शकते, मनपा पाणी पुरवठा योजनेवर पन्नास कोटी खर्च करत असताना ही बाब अंमलात आणली पाहिजे ! पुढील वर्षी खुलताबाद येथील मलिक अंबर यांच्या मजार परिसरात असा कार्यक्रम घेतला जाईल, दरवाजे, लेण्या, पाणचक्की, मकबरा आणि नहर या शहराची ओळख असून शहाजीराजे यांना मलिक अंबर यांनी गनिमी कावा शिकविला असे सांगितले.
डॉ. शेख एजाज मुन्शीमिया यांनी सामाजिक सौहार्द काळाची गरज असून मलिक अंबर यांनी १६३३ साली मोगलशाहीस विलिन केले, चारशे वर्षांपूर्वी खडकी का वसविली, त्यांची शेतकरी कल्याण योजना, जलस्तोत्र व्यवस्थापन आणि इतिहासकारांकडून दुर्लक्षित मलीक अंबर याबाबत माहिती देताना खडकी शहर त्यातील प्राचीन खडकेश्वर आदींचे विवेचन करत मलिक अंबरच्या काळात बाराही महिने शुद्ध पाणी मिळत होते, अशी माहिती दिली.
माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांनी मलिक अंबर, डॉ. रफीक झकेरिया, डॉ. शंकरराव चव्हाण यांचे औरंगाबादच्या विकासात महत्वाचे योगदान आहे, तसेच देशातील मुळ निवासियांचे योगदान दुर्लक्षित केले जात आहे, मलिक अंबर यांचे कार्य पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
लेखक शाहू पाटोळे यांनी मराठ्यांचा इतिहासच मलिक अंबरपासून सुरू होतो, अॅबिसिनीया येथील हबशी या आदिवासी जमातीत ते जन्मले, त्यांच्या पूर्वजांच्या रक्तातच बांधकाम शैली विकसित झाली होती, जगभर हे कष्टाळू लोक पसरत गेले, असे सांगितले.
डॉ. जाकीर पठाण यांनी मलिक अंबर यांच्यावर आपण पुस्तक लिहित असून यासाठी मोरोक्को येथूनही लिखित सामुग्री मिळविली आहे, असे सांगितले, तर भाजपचे नेते नबी पटेल यांनी पुढील कार्यक्रम रोषणगेट परिसरात घेण्यात यावा, यासाठी हॉल उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले.
....
प्रतिक्रिया
मलिक अंबर हे कमालिचे जलतज्ज्ञ आणि धर्मनिरपेक्ष बादशहा होते, त्यांनी ब्राह्मणांनाही पोथी पठणासाठी चिताखाना, ख्रिश्चन लोकांसाठी चर्च उभारले, भारतीय नसूनही हरारा (इथिओपिया) या वाळवंट असलेल्या भागातून ते आले, मलिक अंबरकालिन शिलालेख जमा केले असून, न्याय देणारे, जनतेच्या तक्रारी ऐकणारे ते राजे होते - मिर्झा अस्लम बेग (इतिहास तज्ज्ञ)
मलिक अंबर यांचा वंशज असलो तरी त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे, भविष्यात त्यांच्यावर पुस्तक प्रकाशित करणार आहे - ॲड अत्ताऊरहमान अंबरी मलिक अंबर यांचे १६ वे वंशज यांनी अभार मानले.
No comments:
Post a Comment