काँग्रेसच्या कर्नाटकातील विजयाचा कल्याण तालुक्यात विजयोत्सव ! "महाराष्ट्रात भाजपाचा सुफडा साफ करण्याचा निश्चय"
कल्याण, (संजय कांबळे) : नुकत्याच कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तब्बल १३७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले असून या निवडणुकीत बलाढ्य अशा भाजपाचा जवळपास 'सुपडा साफ' केला आहे. याचा विजयोत्सव आज कल्याण तालुक्यात गोवेली येथे पेढे वाटून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, ठाकरे गटाचे विश्वनाथ जाधव तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयराम मेहेर उपस्थित होते. या प्रंसगी कर्नाटक जनतेने राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्या बद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.शिवाय महाराष्ट्रात देखील भाजपाचा 'सुफडा साफ' करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.
कर्नाटक राज्यात भाजप पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. लोकशाहीचा हा विजय आहे. देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री, अनेक वरिष्ठ नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी डझनभर मंत्री कर्नाटकात भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. येथे आश्वासनाचा पाऊस पाडला, परंतु कर्नाटक जनता यांच्या भुलथापाना बळी पडले नाही. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वर विश्वास ठेवून मतदान केले. व तब्बल १३७ च्या वर उमेदवारांना विजयी केले. येथे भाजपाला केवळ ६२ जागांवर समाधान मानावे लागले.
देशात महागाई, बेरोजगारी, जातीय राजकारण, सुडाचे राजकारण आदी कारणामुळे भाजपाच्या विरोधात जनमत तयार होत आहे. महाराष्ट्रात झालेली गद्दारी ही लोकांना आवडलेली नाही, याचा परिणाम म्हणून महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तूफान सहानुभूती मिळत आहे. अशातच नुकताच उच्च न्यायालयाने दिलेला सत्ता संघर्षाचा निकालावरून समाजमाध्ममातून नेटक-यानी शिंदे फडणवीस सरकारला फटकारले आहे. अशावेळी कर्नाटक जनतेने दिलेला कौल देशाला दिशा ठरणारा आहे असे तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी सांगितले.
यावेळी पेढे वाटून व फटके वाजवून हा विजयोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी विश्वनाथ जाधव साहेब तालूका प्रमुख शिवसेना ठाकरे गट जयराम मेहर, तालूकाध्यक्ष राष्टवादी काॅंग्रेस अँड अवीश जुवारी, रा काँ पा, शैलेश अधिकारी, अमोल सुरोशे, बुंडू डोंगरे, सुनील शिर्के, राम सुरोशे, विलास सोनावळे, प्रशांत एगडे, भास्कर टेंभे, हरिश्चंद्र धुमाळ, राजेश दोंदे, बाबू पवार, संतोष शेलार, आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी *कर्नाटक तो झाकी है, अभी देश बाकी है* अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला गेला.
No comments:
Post a Comment