बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १०० विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप !
*स्फूर्ती फाउंडेशन व महिला जिल्हा महिला व बालविकास विभाग ठाणे यांचा संयुक्त उपक्रम*
स्फूर्ती फाउंडेशन गेले अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत आहे समाजातील विधवा महिलांना स्वयंरोजगार मिळावा त्या़ंना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी लागणारा रोजगार मिळावा व त्या मुलांचे शिक्षण व लग्नकार्य यासाठी आधार मिळावाया या उदात्त हेतूने स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व सदस्या शिल्पा तांगडकर यांनी पाऊल उचलत महिला बालविकास विभाग व स्फूर्ती फाउंडेशन च्या माध्यमातून मागील एप्रिल महिन्यात ५० व मे महिन्यात ५० अशा एकूण १०० मशीन चे वाटप कल्याण पश्चिम, पूर्व, टिटवाळा, डोंबिवली परिसरातील १०० विधवा महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण व मोफत शिलाई मशिन वाटप केले.
कै.भाऊराव पोटे विद्यालय येथे दुसरा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महिला बालविकास विभाग अधिकारी ठाणे महेंद्र गायकवाड, विदयाधर गांवकर, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता नूपिंदर कौर,मा.नगरसेविका लक्ष्मी बोरकर, पोटे विद्यालयाचे अनंत कदम सर, मराठा उद्योजक लाॅबी चे मंगेश शेळके, आम्ही नगरकर चे तानाजी करपे, सामाजिक कार्यकर्ते रंजना माने, आम्ही नगरकर संस्थेचे प्रशांत आहेर उपस्थित होते यावेळी जेष्ठ पत्रकार व शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले
प्रामाणिक इच्छाशक्ती व दृढ निश्चय असेल तर सर्वसामान्य कार्यकर्ता हि कोणताही आधार न घेता शासकीय योजना तळागाळातील गरजू व निराधार महिलांपर्यंत पोहचवू शकतो असे बजरंग तांगडकर म्हणाले, महिलांनी उपलब्ध झालेल्या मशिन चा योग्य वापर करून मुलांचे शिक्षण पूर्ण करावे अशी इच्छा शिल्पा तांगडकर यांनी व्यक्त केली .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांती पाटील, गणेश कंडू, निखिल सोनटके, लक्ष्मण शिंपी, शशिकांत पात्रे, शिवम पांडे, सुवर्णा दुशिंग, यांनी विशेष मेहनत घेतली.
बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांनी उपस्थित मान्यवरांचे व महिला भगिनींचे आभार मानले.
No comments:
Post a Comment