महापालिकेच्या "९/आय" प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर तसेच महापालिकेच्या "८/ग" प्रभागातील डी.पी. रस्त्यात बाधित बांधकामावर निष्कासनाची कारवाई !
कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "८/ग" प्रभागाचे सहा. आयुक्त संजय साबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील आशा देवी मंदिर ते बालाजी गार्डन पर्यंतच्या डी.पी. रस्त्यात बाधित घराच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली.
तसेच महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली "९/आय" प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नेवाळी नाका, मलंग रोड येथील ३ अनधिकृत गाळे, ५ टप-या, ५ जोते (foundation) व चाळीच्या (एकूण ९ रुम) बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली.
No comments:
Post a Comment