Tuesday, 9 May 2023

बेगमपुरा पोलिस व माणुसकी समुहाने दिला ३० वर्षीय मनोरुग्ण महिलेला न्याय....

बेगमपुरा पोलिस व माणुसकी समुहाने दिला ३० वर्षीय मनोरुग्ण महिलेला न्याय.... 

*दिव्य सेवा प्रकल्प बुलढाणा येथे पुनर्वसनासाठी केले दाखल*

सु-लक्ष्मी व बोधी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेतर्फे मदतकार्य

आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो. रात्री अपरात्री काही झालं तर? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते. घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते.पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात; ती कुणाची तरी आई, मुलगी, अथवा पत्नी, किंवा बहीण असेल.पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही.अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे. कारण त्या आजारी आहेत मनोविकृत आहेत.बेगमपुरा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हणुमान टेकडी, विद्यापीट गेट परिसरात अनेक दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त एक महिला फिरत असून, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास देणे, लोकांना दगड मारणे, रोडवर जोरदार ओरडुन दहशत निर्माण करत होती. ती रात्री बेरात्री आपले स्वतःचे डोके जमिनीवर  जोरजोरात मारणे. परीस्थिती एवढी भयानक होती की, काही माणुसकी हीन लोक रात्रीच्या वेळी तीच्या मागे मागे देखील फिरायचे. रात्री पेट्रोलींग करतांना ही बाब पोलीसउप निरिक्षक विनोद भालेराव यांच्या लक्षात आली असता,त्यानी त्या मनोरुग्ण महिलेची चौकशी केली. ती बिहार राज्यातील असावी.एक बेवारस निराधार महिला आहे हे त्यांच्या लक्षात आले. पुनर्वसनासाठी  ज्या सामाजिक संस्था  काम करतात  त्यात भालेराव यांनी सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्ण समूहाचे सामाजसेवक श्री सुमित पंडित यांना माहिती दिली असता, सुमित पंडित यांनी  लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर यांनी ती मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे सांगितले. सुमित यांनी तीच्या पुनर्वसनासाठी विविध आश्रमांची विचारपूस केली, असता बुलढाणा  जिल्ह्यातील वरवंड येथील दिव्या फाऊंडेशन चे श्री.अशोक काकडे यांच्याशी फोन द्वारे संपर्क करुन त्या महिलेला पुनर्वसना साठी मनोरुग्ण सेंटर येथे नेण्याचे ठरवले. कारण दुर्दैवाने औरंगाबाद जिल्ह्यात येथे अश्या मनोरुग्ण महिलांसाठी पुनर्वसनाची काहीच व्यवस्था नाही. शासकीय रुग्णालय घाटी येथे वैद्यकीय तपासण्या करुन त्या महिलेला सुरक्षित पणे बुलढाणा येथील मनोरुग्ण सेंटर येथे खासगी वाहनाने नेण्यात आले. या सामाजिक कार्यात बेगमपुरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे, स.नो.पी.हरेश्वर घुगे, पोलीस उपनिरिक्षक विनोद भालेराव, पोलीस कर्मचारी संतोष चव्हाण, आत्माराम जाधव,
ज्ञानेश्वर गंगावणे,प्रकाश मानवते, महिला पोलीस वानखेडे मँडम, ज्योती काकडे व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित, आशोक काकडे, गजानन नाईक,
समाजसेवीका पुजा पंडित, बोधी बहु उद्देशिय संस्थेच्या डॉ. रंजना प्रशात दंदे आदिंनी मेहनत घेतली.
---------------------------------------------------------------------
एक सामाजिक दायित्व व कर्तव्य म्हणुन मनोरुग्ण महिलेला दिला न्याय

एक सामाजिक दायित्व व कर्तव्य स्वीकारणारे याचं उत्तर माणुसकी समुहा शिवाय दुसरं काय असेल.ती महिला मानसिक आजाराने पीडित आहेत.हा त्यांचा गुन्हा आहे का ? समाजाने वाळीत टाकलेल्या ह्या महिलांवर शारीरिक अत्याचार होत नसतील का ? अमानुष लोकांच्या वासनेच्या शिकार झालेल्या ह्या महिलांपासून जन्माला आलेल्या अनाथ मुलांचा भार कोणी सांभाळावा? प्रश्न ह्या एका महिलांचाच नाही, तर अजून समाजात हजारो निराधार महिला किती असतील.ज्या अशाच अबोध आपल्या देहाला बेसुध मिरवत असतील, समाजातील वाईट नजरे समोर. मग यांच्यासाठी एक मायेचं आपुलकीचं घर आहे का ? यांना असच उकिरड्यावर ठेवायचे काय ? समाजाच दायित्व काहीच नाही का ? हे मनोरुग्ण देखील आधी सामान्य जीवन जगत होते. जीवनात संकट सांगुन येत नसतात. आपण आपल्या मर्यादा जर खरच वाढवल्या आणि मदतीचा हात सामाजिक संस्थाना लावला,जे अशा स्वरूपाचं काम करण्यास उभे होत आहेत. तेव्हा खऱ्या अर्थाने मनोरुग्णाचा मानसिकतेत स्थिरता येईल. आणि समाजाची खरी मानसिक विकृत वृत्ती नष्ट होईल.

  ---- साय्यक पोलीस निरिक्षक हरेश्वर घुगे, बेगमपुरा, शहर पोलीस स्टेशन

------------------------------------------
माणुसकी समुहाचे कार्य मनोरुग्णा साठी लाख मोलाचे..

मनोरुग्णांच्या जवळ देखील कोणी जायला तयार होत नाही. ते खूप सेन्सिटिव्ह असतात.कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात. परंतु समाजसेवक सुमित पंडित करत असलेल्या रंजल्या गांजल्यांच्या सेवा ही खरंच वाखनने योग्य आहे. मनोरुग्णा साठी ते स्वतः दाढी कटिंग व स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना माणसात आणतात व त्यांना हक्काचा निवारा मिळवून देतात.आज प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी त्यांना या मनोरुग्ण महिलेला कोणी जवळही जाण्याची हिंमत करत नव्हते, त्याप्रसंगी समाजसेवक सुमित पंडित यांनी मोठे हिमतीने त्या महिलेला हक्काचा निवारा मिळवून दिला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.. समाजात अशी खूप कमी लोक आहेत की ते दुसऱ्यासाठी जगतात..

      ---- शिवाजी तावरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेगमपुरा

शब्दांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...