दहागाव पोई बांधणेपाडा येथे सिंमेटचा कंटेनर घरात घुसला, सुदैवाने जिवीत हानी नाही, परंतु वित्त हानी मोठ्या प्रमाणात !
कल्याण (संजय कांबळे) : रायते दहागाव रस्तावर प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव समोर आपटी हुन बदलापूर दिशेने सिंमेट घेऊन जाणारा कंटेनर नं एम एच ४६, बी बी ९१३९ हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात घुसला सुदैवाने यामध्ये कोणाच्याही जिवीतास धोका झाला नसला तरी दोन मोटारसायकल व एक वाँगनर व घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असे किसन मारुती बांधणे व शरद बांधणे यांनी सांगितले, ही घटना आज सकाळी १२:५मिनिटांनी घडली आहे,
रायते बदलापूर हा रस्ता मोठ्या प्रमाणात वर्दळीचा झाला आहे, अशातच याच भागातून मुंबई वडोदरा एक्सप्रेस हा महामार्ग, जातो आहे याचे गोडाऊन प्लॅन आपटी फाटा समोर उभारण्यात आले आहे, शिवाय येथे सिमेंट मिक्सिंग प्लॅन देखील आहे, त्यामुळे दररोज शेकडो कंटेनर, आयवा गाड्या या रस्त्यावर ये जा करत असतात.
आज सकाळी १२:५० वाजता आपटी हून बदलापूर कडे सिंमेट घेउन जाणारा कंटेनर दहागाव पोई चौकापासून थोडे पुढे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ असलेल्या किसन मारुती बांधणे व शरद बांधणे या शेतकऱ्याच्या घरात घुसला, एकच प्रपंच आवाज झाला, काय झालं कोणालाही कळले नाही, सिंमेट पत्रे, एक वाँगनर गाडी, दोन स्कुट्या, भिंत यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, सुदैवाने कोणी बाहेर नसल्याने आम्ही वाचलो असे शरद बांधणे यांनी सांगितले, त्यामुळे अशा वाहनांना या रस्त्यावर बंदी घालावी व या वाहनचालक तसे मालकावर कडक कारवाई करावी अशी मागणी बांधणे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment