Tuesday, 9 May 2023

उल्हासनगर मधील घटना, बहिणीच्या कपड्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाने भावाने घेतला बहिणीचा जीव !

उल्हासनगर मधील घटना, बहिणीच्या कपड्यावर पडलेल्या रक्ताच्या डागाने भावाने घेतला बहिणीचा जीव !

भिवंडी, दिं,९, अरुण पाटील (कोपर) :
             बहिणीच्या काड्यावर रक्ताचे डाग दिसल्याने संशयित भावाने आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध असल्याच्या गैरसमज होऊन आपल्या १२ वर्षांच्या बहिणीची हत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ माळी आहे.
             हा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातील  उल्हासनगर येथे घडला आहे. माया (बदललेले नाव) ही तिचा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत उल्हासनगर येथे राहते. तिचा भाऊ सुरेश (नाव बदललेले) हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी या मुलीला पहिल्यांदा पाळी आली. सुरेशने तिच्या कपड्यांना लागलेले रक्ताचे डाग पाहिले आणि त्याला तिच्यावर संशय आला.
          मायाचे प्रेमप्रकरण असावं आणि त्यातून तिचे शरीरसंबंध निर्माण झाले असावेत, या संशयाने सुरेशला पछाडलं. त्याने तिच्याकडे कडक शब्दांत याबद्दल विचारणा केली. त्यावेळी मासिक पाळीच्या चक्राविषयी संपूर्णतः अनभिज्ञ असलेल्या मायाला याविषयी काहीही सांगता आलं नाही. त्यामुळे सुरेशचा संशय बळावला.
          त्याने रागाच्या भरात तिला गरम चिमट्यांनी चटके दिले. त्यामुळे ती गंभीररित्या भाजली. तिला उल्हासनगर येतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिला दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या चेहऱ्यावर, पाठीवर आणि शरीरावर अनेक ठिकाणी भाजल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी सुरेशवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मायाचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...