भिवंडीतील निजामपूर, शांतीनगर व भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कित्येक वर्ष पासून सुरू आहेत, मटका -जुगार, मुख्य आरोपीवर कारवाई नाही !!
भिवंडी, दिं, १९, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडीतील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील. नजराणा कंपाऊंड येथे गेल्या कित्येक वर्षापासून मटका-जुगार सुरू असुन मात्र ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या तक्रारीत वाढ झाली असताना अखेर निजामपूर पोलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. तर भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामणकर नाका, पद्मानगर गल्ली, बिरजू पाव भाजी सेंटर येथे देखिल छापा मारून दोघांना अटक केली आहे मात्र या दोन प्रकारानातील मुख्य आरोपी मटका, जुगार माफिया यांच्यावर कारवाई करण्यास पोलीसांनी उत्सुकता दाखवली नसल्याने नागरिकांना मधून संशय व्यक्त होत आहे.
सविस्तर हकीगत आशी की, निजामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वरील ठिकाणा वरील लासी सायकल मार्टच्या मोकळ्या जागेत पोलीसांनी छापा टाकून मटका-- जुगार खेळणाऱ्या साबीर कादिर खान, (३८) व विनोद श्रीफलचंद सहनी (२६) यांना ताब्यात घेतले आहे.
तर दुसऱ्या घटनेत भिवंडी शहर पोलिसांनी तुकाराम नरसय्या कुंदाराम (५०) व अनिल श्रीधर पाटील(२८) यांना रांगे हाथ पकडून ताब्यात घेतले आहे.पोलीसांनी या सर्वांवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. अश्याच प्रकारे शहरातील कणेरी, खोका कंपाऊंड, नागाव, खाडीपार या व इतर ठिकाणी सद्या जोरात धंदे सुरू आहेत. शांतीनगर पोलिस पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाबाला कंपाऊंड, गायत्री नगर, रुबी हॉटेल, गॅलक्सी टॉकीज, नायगाव अश्या अनेक ठिकाणी मटका, जुगार चालू आहे त्यांच्या पण तक्रारी असून संबंधित पोलिस स्टेशन काहीही कारवाई करत नाही आहे.
झटपट पैसा कमावण्याच्या नादात तरुण वर्ग जुगार मटका या वाम मार्गाला लागला असून त्या साठी हा तरुण वर्ग गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. चोऱ्या ,चैन स्नेचींग, लुटमार, असे व इतर प्रकार सर्रास पाहायला मिळत आहेत. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे असे अवैध धंदे बंद झाल्यास गुन्ह्यांवर व गुन्हेगारांवर आळा बसू शकतो. तसेच अनेक संसार उद्धवस्त होण्यापासून वाचतील, असे जाणकारांचे मत आहे.
No comments:
Post a Comment