चोपडा पोलिस स्टेशनचे पी आय के के पाटील यांनी रात्रीचे वेळी शेंकडों लोकांसमोर केली दमदाटी !
*गल्ली गुंडांच्या त्रासाविरुद्ध वयोवृध्द महिलेचे बेमुदत उपोषण*
चोपडा, प्रतिनिधी.. चोपडा येथील अरुण नगर मधील श्रीमती लिलाबाई तुकाराम चौधरी वय ६६, या दुग्ध व्यवसाय करून पोट भरतात. फेब्रुवारी महिन्यात त्यांचे ताब्यातील जागेवर घर बांधण्याचे कामास सुरुवात केली.. अरुण नगर मध्ये ५० टक्के घरे पक्की बांधलेली असून अरुण नगर सिटी सर्वेला त्यांची नोंद नाही. उत्तरत्यामुळे बांधकामासाठी नगर पालिकेची काही अडवणूक सुध्धा नाही, फक्त नगरपालिका मालमत्ता कराच्या पावत्या वसूल करते. श्रीमती चौधरी कडूनही नगर परिषद ने सदर जागेच्या एकरकमी पंचवीस हजार रुपये थकीत घरपट्टी वसूल करून घेतली. पण शेजारचे गल्ली गुंड मला त्रास देऊ लागले. त्यांचे विरुद्ध तक्रार दिली. पोलीस स्टेशनला चौकशीला गेली. पण त्यांना दिलासा देण्याऐवजी जे आरोपी त्यांना त्रास देतात अशा आरोपींना स्फुरण चढेल, असा व्यवहार चोपडा पोलीस स्टेशनचे पीआय के.के. पाटील यांनी ५ मार्च २०२३ रोजी रात्री आमच्या घरी येऊन श्रीमती चौधरी व त्यांचे भावजय नंदाबाई चौधरी याना शेकडो लोकांसमोर दमदाटी केली. अपमानित केले त्यामुळे आरोपी व्यक्ती आमचे काय झाले ? अशा बढाया मारत आहेत व त्यांचा छळ करीत आहेत. अनेकदा तक्रारी व पाठपुरावा करून ही तक्रारींची दखल घेतली गेली नाही.
तरी या आरोपींवर कारवाई करावी म्हणून श्रीमती.. लिलाबाई तुकाराम चौधरी या चोपडा तहसीलदार कचेरीवर १७/०५/२३ पासून उपोषणाला बसणार होत्या, पण पी आय यांनी कारवाई करतो असे आश्वासन देत काल संध्याकाळपर्यंत बसून ठेवले शेवटी त्यांना घरी जावे लागले, म्हणून आज १८/०५/ २४ पासून ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत, श्रीमती लीलाबाई चौधरी यांना लाल बावटा शेतमजुर युनियनचे नेते कॉम्रेड अमृत महाजन यांनी पाठिंबा दिला आहे व त्यांचीच मदत ३ महिन्यांपासून श्रीमती चौधरी याना आहे. *दरम्यान उपोषणाच्या पहिल्या दिवशी चोपडा जिल्हा उप रुग्णालयाचे डॉक्टर यांनी श्रीमती चौधरी यांची तपासणी केली व यांना ऍडमिट करावे लागेल असे सांगितले, "डॉक्टर आणि पोलीस अधिकारी" एकमेकांचे जवळच्या नात्यातले असल्याने संगनमताने श्रीमती चौधरी यांनी उपोषणास बसू नये म्हणून असा बनाव केल्याचे दिसून येत आहे*** कडक व शिस्तबद्ध अधिकारी दाखवण्यासाठी सामान्य जनतेवर अशा तऱ्हेने केलेला अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा कॉ महाजन यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment