विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (१९ मे) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर !
मुंबई, अखलाख देशमुख, दि १८ :- दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शुक्रवार दिनांक १९ मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
अकोला जिल्ह्यातील श्री राजराजेश्वर मंदीराला सकाळी १० वा. भेट देऊन ते प्रथम दर्शन घेणार आहेत. नंतर स. १०.१५ वा. दंगलग्रस्त भाग जुने शहर, हरिहरपेठ भागाची पाहणी करून नागरीकांशी संवाद साधतील. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स. १०.४५ वा. सदर घटनेत मृत पावलेले दिलीप गायकवाड यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील.
त्यानंतर स.११.१५ वा. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसांच्या समवेत कायदा व सुव्यवस्थेविषयी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतील. त्यानंतर दुपारी १२.०५ वा. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकरांशी वार्तालाप करतील.
No comments:
Post a Comment