Friday, 12 May 2023

कोकणाचा रत्नागिरी हापूस शहरात दाखल, आंबा महोत्सवाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा !

कोकणाचा रत्नागिरी हापूस शहरात दाखल, आंबा महोत्सवाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. १२ : 
मागील वर्षी औरंगाबाद उच्चतम बाजार समितीच्या आवारात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला शेतकरी व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी बाजार समितीच्या निवडणुका झाल्या सभापतीची निवडणूक झाली नसल्याने आंबा महोत्सव लांबण्याची शक्यता आहे. शेतकरी आंबा महोत्सवाच्या प्रतिक्षेत आहेत. 

आंबा महोत्सवाचे आयोजन केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते. बाजार समिती परिसरात कोकणाचा रत्नागिरी हापूस आंबा दाखल झाला आहे. हापूस आंबा उत्पादक शेतकरी शाहीन खान यांच्याशी "बातमीदार माझा"चे प्रतिनिधी यांनी संपर्क केला असता त्यांनी सांगितले. 

लवकर आंबा महोत्सवाचे आयोजन केले तर परिसर व बाहेरील शेतकरी वर्गाला याचा फायदा होणार आहे. मागील वर्षी आम्ही महोत्सवात सहभाग घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांना सुध्दा फायदा झाला होता. रत्नागिरी हापूस आंबा आमच्याकडे उपलब्ध आहे. आंबा खाणा-या खवैय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आमच्याकडे चार हजार ते साडेतीन हजार रुपये दराने 17 किलोची पेटी उपलब्ध आहे. कच्चा आंबा सुद्धा उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर स्टाॅल लावला आहे. ग्राहक संपर्क करु शकतात.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...