नवी मुंबई पोलीसांच्या निर्भया पथकासाठीच्या वाहनांचे आज लोकार्पण !
नवी मुंबई, प्रतिनिधी : पोलीस आयुक्त श्री. भारंबे यांनी महिला सुरक्षा प्रकल्पाची माहिती दिली. श्री. भारंबे म्हणाले की, नवी मुंबई पोलीसांच्या निर्भया पथकासाठीच्या वाहनांचे लोकार्पण आज झाले. येत्या दोन महिन्यात आणखी 10 चारचाकी व दुचाकी वाहने देण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला प्रत्येकी एक निर्भया वाहन मिळणार आहे. गर्दीची ठिकाणे, मुलींची छेडछाड होणाऱ्या भागात ही वाहने गस्त घालत राहतील. डायल 112 उपक्रमास नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवी मुबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे तिथे येणाऱ्या सर्व महिलांना सर्वतोपरी मदत केली जाईल. जिल्हा नियोजन समितीमधून पोलीसांसाठी वाहने दिली जातात.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी सूत्रसंचालन केले. सावली इमारतीमध्ये महिला सहाय्यता कक्ष असून तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच याच इमारतीमध्ये सायबर पोलीस ठाणेही स्थापन करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांची पाहणी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment