Friday, 12 May 2023

नवतरुणांसाठी आ. प्रशांत बंब यांचा आगळा वेगळा उपक्रम !

नवतरुणांसाठी आ. प्रशांत बंब यांचा आगळा वेगळा उपक्रम ! 

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील ७५ युवा शेतकऱ्यांना १५० गायींचे वाटप करण्यात आले. गो सेवेसह युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याहेतूने हा अभिनव प्रकल्प राबविण्यात येत आहे. 

धामणगाव येथे काल 75 लाभार्थीपर्यंत आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते 150 गायी सुपूर्द करण्यात  आल्या. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत गंगापूर तालुक्यातील 150 लाभार्थीपर्यंत 300 गायी वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार प्रशांत बंब यांनी हाती घेतला आहे.

दीवाळी वासूबारस पर्यंत 1000 लाभार्थांना ही गायी  वाटप करनार आहे. जर नवतरूणांनी चांगली साथ दीली तर आमदार प्रशांत बंब 15000 नवतरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी दीलेली आहे 

त्याच बरोबर इतरही वैयक्तिक सरकारी लाभ महीला व नवतरुण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणर असाही शब्द दीलेला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून संकलित होणारे दूधासंबंधी अमूल कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. 

या उपक्रमाचा शुभारंभ करण्याकरिता केंद्रीय मंत्री रावसाहेब जी दानवे, केंद्रीय मंत्री भागवत जी कराड, मा. श्री हरिभाऊ बागडे ( नाना ) यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारसंघातील अनेक गोसेवक व नागरिक उपस्थित होते.

वृत्त - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ;  उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!! ठाणे...