Friday, 12 May 2023

परिचारिका म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या मधील दुवा !

परिचारिका म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या मधील दुवा !  

*काळजीची गुणवत्ता -  परिचारिका*

आज 12 मे, हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो. जगात रुग्णांच्या सेवा-सुश्रुषेची सुरुवात करणाऱ्या तसेच सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका (नर्स) फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.

परिचारिका म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील असते दुवा,
त्यांच्या अमूल्य सेवेची कृतज्ञता आपल्या मनामध्ये ठेवा..!

आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

अखलाख देशमुख‌ 

No comments:

Post a Comment

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ; उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!!

१३० हिऱ्यांमध्ये मानाचा हिरा ;  उपनियंञक, नागरी संरक्षण, नवीमुंबई समुह, ठाणे श्री. विजय जाधव यांचा ठाण्यात कौतुक सन्मान !!! ठाणे...