Sunday, 14 May 2023

'उमेद' अंतर्गत शिवकन्या महिला प्रभागसंघ, महिला बचत गटाच्या सर्वसाधारण सभेचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन !

'उमेद' अंतर्गत शिवकन्या महिला प्रभागसंघ , महिला बचत गटाच्या सर्वसाधारण सभेचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उदघाटन !  

सिल्लोड, अखलाख देशमुख, दि  १४ :  'उमेद' अंतर्गत शिवकन्या महिला प्रभागसंघ , महिला बचत गटाच्या सर्वसाधारण सभेचे उद्घाटन कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाले. यावेळी ना.अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिलांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनेची माहिती देत मंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन याप्रसंगी केले.

        यावेळी नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, न.प. तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजी वाघ, नगरसेवक सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक नवनाथ पवार आदिंसह महिला बचत गटाच्या अध्यक्षा , सचिव व सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न !

सोहन कौर सतविंदर सिंग मानकू एज्युकेशन सोसायटी (रजि.) संचालित गुरु गोविंद सिंग इंग्लिश स्कूल चे  वार्षिक स्नेहसंमेलन, विद्यार्थी गुणगौरव समार...