शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या कार्यालयासमोर होणारे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित : शेख अब्दुल रहीम
*शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी दिले 15 दिवसात शिक्षण उपसंचालक यांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ४ : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनतर्फे आयोजित धरणे आंदोलन शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी स्वतः फोन करून चर्चा केली व विनंती केली की आपण धरणे आंदोलन करू नये म्हणून शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्या विनंतीला मान देऊन तसेच लेखी पत्राद्वारे आश्र्वासित केल्याने काही काळासाठी आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनी घेतलेला आहे. तसेच धरणे आंदोलन सध्या स्थगित केले आहे असे एका निवेदनाद्वारे शिक्षण संचालनालय प्राथमिक पुणे व पोलीस ठाणे बंडगार्डन यांना कळविण्यात आलेले आहे.तसेच निवेदनाची एक प्रत शिक्षण आयुक्त कार्यालयात ही देण्यात आलेली आहे.
"प्राथमिक शिक्षण संचालक पुणे कार्यालयासमोर शरद गोसावी साहेब यांचे लक्ष वेधण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु शिक्षण संचालक प्राथमिक यांनी आपली मागणी लवकरच पूर्ण करण्याचे व योग्य तो न्याय देण्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासित केलेले असल्यामुळे धरणे आंदोलन काही काळासाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय आमच्या संघटनेने घेतलेला आहे. मात्र येत्या 15 दिवसात कोणतीही कारवाई झाली नाही तर लगेच 22 मे 2023 सोमवार पासून "बेमुदत धरणे आंदोलन" करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा ही देण्यात आला.
No comments:
Post a Comment