Thursday, 4 May 2023

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलकाची घेतली भेट !

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सकल मराठा समाजाच्या आंदोलकाची घेतली भेट !

*१ मे पासून मराठा आरक्षणासाठी सुरू आहे आंदोलन*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ४ : औरंगाबाद येथील क्रांती चौक येथे सकल मराठा समाजातर्फे ओबीसी आरक्षणासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली आहेत. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्यात यावी अशी आंदोलकाची मागणी असून मराठा समाज अनेक सामाजिक बाबतीत मागास असून सुद्धा तरी त्यांला आरक्षण नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे. येथील आंदोलकांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.यावेळी अंबादास दानवे यांनी भेट देऊन आंदोलकाची समजूत काढली.

आंदोलकांनी यावेळी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन जिल्हे वगळता अन्य राज्यभरातील मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र दिले तर हक्काचे आरक्षण का दिले जात नाहीत.तसेच राज्यभरातील मराठा समाजाला पूर्वीचे प्रमाणपत्र दिले जात आहेत. तसेच मराठा समाज  सामाजिक बाबतीत मागास असल्याचे अनेक आयोग समित्या व शासकीय माहिती सिद्ध केले आहेत. तरीही सुद्धा आरक्षण का दिली जात नाही असा प्रश्न यावेळी आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

१ मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून सकल मराठा समाजातर्फे औरंगाबाद येथील क्रांती चौक येथे बेमुदत आंदोलन सुरू आहेत. येथील महिला आंदोलकांनी आरक्षण मिळाले नाही तर उद्याच आत्मदहन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. तसेच शिंदे फडणवीस सरकार टिकवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जात आहे परंतु मराठा आरक्षणासाठी ते काहीही करत नसल्याचा आरोप आंदोलकानी लावला.

*यावेळी माध्यमांशी बोलताना दानवे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले केलेले नाहीत. शिंदे - फडणवीस सरकार फक्त वेळ काढू पणा करत असल्याचा आरोप लावला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे नाही अशी केंद्रातील भाजप व व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारची भावना आहेत. तसेच राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचे बाजू मांडण्यास कमी पडण्याचा आरोप ही त्यांनी यावे लावला. तसेच फडणवीस सरकार यांनी विरोधी विरोधी पक्षात असताना आमचे सरकार आल्याबरोबर मराठा मराठा समाजाला आरक्षण दिले असे म्हटले होते ते आश्वासन त्यांनी पाळले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी लागला.*

यावेळी आंदोलनप्रसंगी चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, सतीश वेताळ, रेखा वाहटूळे, दिव्या पाटील, सुकन्या भोसले, मनोज गायके, रविंद्र वाहटूळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...