Monday, 8 May 2023

कर्नाटक: विधानसभा निवडणुकीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार *मनीकांत राठोड* *यांच्यावर गुन्हा नोंदवा- युसुफ शेख

कर्नाटक विधानसभा  निवडणुकीतील भाजपाचे अधिकृत उमेदवार *मनीकांत राठोड* *यांच्यावर गुन्हा नोंदवा-  युसुफ शेख

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ८ : औरंगाबाद येथील पोलीस उपायुक्त  शिलवंत नांदेडकर याच्याकडे आज औरंगाबाद शहर काॅग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील चित्तूपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार *मनीकांत राठोड* यांनी धमकी दिली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून मनीकांत राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. कर्नाटकात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मा. खर्गे साहेब व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका संभवतो. जीवे मारण्याची धमकी देण्याचा सबळ पुरावाही सोबत जोडलेला आहे.

काँग्रेस अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावे म्हणून औरंगाबाद शहर जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली *निवेदन* देण्यात आले. यावेळी गुलाब पटेल कांचन कुमार चाटे औरंगाबाद जिल्हा महिला काॅग्रेस कमिटीच्या अध्यक्ष मा. हेमा ताई पाटील व शहर अध्यक्षा. दिपाली मिसाळ, डॉ अरुण शिरसाट डॉ पवन डोंगरे अनिस पटेल, अकेफ रझवि अस्मत खान माधवी चांद्रकी  उमाखंत खोतकर मंजू लोकंडे, आनंद भामरे परवीन देशमुख किशोर नामेकर सय्यद फैजयुदिन सलिम खान उमर खान फैयाज खान  यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !!

स्वीप कार्यक्रमांतर्गत उरण तालुका मतदान जनजागृती बाईक रॅली संपन्न !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : SVEEP कार्यक्रमांतर्गत उरण त...