_संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला पश्चिम शाळेचा सलग चार वर्ष एसएससी परीक्षेचा शंभर टक्के (100 %) निकाल !!_
मुंबई, प्रतिनिधी दि. 5 - पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ, भिवंडी संचालित *संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल* या शाळेचा शैक्षणिक वर्ष 2019 -20 ते 2022- 23 या सलग चार वर्षाचा दहावीचा निकाल अथक परिश्रम व मेहनत घेऊन शंभर टक्के लावला असे शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत यांनी सांगितले.
दिवसा कामधंदा करून रात्री शाळेत येऊन शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण जास्त आहे. कोरोना काळात नोकरी गमावलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मिळालेले काम कुटुंबाच्या खर्चासाठी टिकवणे महत्त्वाचे वाटत असतानाच काम करून, धावपळ करून, शाळेत पोहचून अभ्यास करणारे व राहिलेले शिक्षण पूर्ण करून स्वप्न पूर्ण करणारे विद्यार्थी रात्र शाळेस पहावयास मिळाले आहेत.
शिक्षणाचे स्वप्न घेऊन आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न भंग होऊ नये म्हणून रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत, वर्गशिक्षक श्री तुकाराम घाटकर, विषय शिक्षक श्री समाधान खैरनार, शुभांगी बामणे, इंग्रजी विषयासाठी मासूम कडून मिळालेले शिक्षक श्री धादवड सर या सर्वांनी वर्षभर अथक मेहनत व परिश्रम व उत्कृष्टरित्या नियोजन करून उत्कृष्टरित्या अध्यापनाचे कार्य करून एसएससी परीक्षेत विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादन करून सलग चौथ्या ही वर्षी मार्च 2023 चा एसएससी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लावला.
*विशेष म्हणजे दोघे पती-पत्नी चालू वर्षी दहावीची परीक्षा देत होते. पती तुकाराम टकले-66% गुण व पत्नी विद्या शिरसाट- 50.60% गुण मिळवलेले आहेत.*
कष्टकरी विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या रात्र शाळांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहेत. *मार्च 2023 च्या एसएससी परीक्षेत तीन यशाचे मानकरी 1) तुकाराम हनुमंत टकले- 66% 2) प्रियांका वाघेकर- 64.80% 3) आरती गुरप्पा जाधव- 61.20%* हे विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास होऊन यशाचे मानकरी बनले.
पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेकडून रात्र शाळेकडून व मासूम संस्थेकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments:
Post a Comment