Thursday, 8 June 2023

मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरण, उत्तर प्रदेश गाझियाबादमध्ये दोन प्रकरणे समोर, तपासासाठी पोलिस ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात झाले दाखल !!

मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरण,  उत्तर प्रदेश गाझियाबादमध्ये दोन प्रकरणे समोर, तपासासाठी पोलिस ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यात झाले दाखल !!

भिवंडी, दिं,८, अरुण पाटील (कोपर )
          मोबाईल गेमिंगच्या सहाय्याने धर्मांतर प्रकरणात शेकडो धर्मांतर झाली असल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांना संशय आहे.या प्रकरणाचे कनेक्शन महाराष्ट्रापासून चंदीगड पर्यंत पोहाचल्याची महिती समोर आली असून आता पर्यंत चार प्रकरणे समोर आली असून त्यांपैकी गाझियाबादमध्ये दोन, फरिदाबाद एक आणि एक चंदीगडचे आहेत. गाजियाबडचे डी सी पी निपुण अग्रवाल यांनी मोबाईल गेमिंग ॲपद्वारे धर्मांतर केले जात असल्याचे सांगितले आहे. अश्याच एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश गाझियाबाद पोलिस ठाण्यातील  मुंब्रा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.
        ऑनलाईन धर्मांतराचा विषय गाजत असून
उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये दोन प्रकरणे समोर आली असताना आता त्यांची लिंक मुंब्रा येथून लागली आहे. शहनवाज नावाच्या एका तरुणाने फेक युजर आयडीच्या सहाय्याने अकाऊंट तयार केले. त्यावरून गेम बनवून गेमच्या मदतीने हिंदू युवा पिढीला धर्मांतर करण्यासाठी आग्रह करत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. या शाहनवाजचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश येथील गाझियाबाद पोलीस थेट ठाण्यातील  मुंब्रा येथील देवरीपाडा परिसरात येऊन पोहचल्याने या गोष्टीचा खुलासा झाला आहे.                       सध्या गाझियाबाद पोलीस हे मुंब्रा पोलिसांसोबत शाहनवाजचा शोध घेत आहेत. सध्या शाहनवाज हा आपल्या परिवारासह फरार आहे. मात्र गेल्या ४ दिवसापासून गाझियाबाद पोलिसांची मुंब्रा पोलिसांसोबत शाहनवाजची शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश-गाझियाबादचे पोलिस उपनिरीक्षक सहदेव सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्ही ३ मे रोजी मुंबईत पोहोचलो आहोत. काही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे निवेदन दिले आहे.
          या प्रकरणाशी संबंधित तपासासाठी आवश्यक पुरावे गोळा करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुढील तपास अधिकारी सहदेव सिंह यांनी सांगितले की, गाझियाबाद पोलीस या प्रकरणाच्या शोधात येथे आलेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात यश आलेले नाही, प्रयत्न सुरू आहेत. आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, कोणतीही गोष्ट अगोदरच कशी सांगता येईल. मुंब्य्रातील ४०० जणांचे धर्मांतर झाल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी येथे आलो आहोत, पुरावे गोळा करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...