Thursday, 8 June 2023

48 लोकसभा व 288 विधानसभेच्या निवडणुक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर !!

48 लोकसभा व 288 विधानसभेच्या निवडणुक प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर !!

कल्याण, (प्रतिनिधी) :- भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष वाढीसाठी व 2024 च्या निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणावर विजय मिळविण्यासाठी 48 लोकसभा व 288 विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा केली आहे.

प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याण लोकसभा प्रमुखपदी जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांची निवड केली आहे, तर कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख पदी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पूर्व विधानसभा संजय मोरे, कल्याण ग्रामीण विधानसभा नंदू परब, डोंबिवली विधानसभा प्रज्ञेश प्रभुघाटे, अंबरनाथ विधानसभा  गुलाबराव करंजुले पाटील, यांची लोकसभा व विधानसभेच्या निवडणुक प्रमुख पदी भाजपा कल्याण जिल्ह्यामधील प्रमुख पदाधिकारी यांची निवड केली आहे.

कल्याण जिल्ह्यातील नेत्यांकडे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारला निवडून आणण्यासाठी पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी जबाबदारी दिल्याने कार्यकर्त्यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत, यामुळे कल्याण डोंबिवली शहरातील भाजपा जल्लोषाचे वातावरण आहे,

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...