आसनगाव मधे जिजाऊ संघटनेचा मदतीचा हात...
गरजूंना पत्रे वाटप तर जखमींना आर्थिक मदत करत दिला आधार..!!
आसनगाव, प्रतिनिधी : तीन दिवसापूर्वी आसनगावं येथे वादळी वाऱ्याने अनेक घरावरील पत्रे उडाल्याने या भागांतील अनेक गाव पाड्यात मोठे नुकसान झाले होते. या बाबात जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांना समजताच जिजाऊ संस्थेच्या ठाणे जिल्हा प्रमुख मोनिका पानवे यांनी जिजाऊ संघटना आसनगावच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भेट देऊन पाहणी केली असता गरजू नागरिकांना मदत करण्याचं आश्वासन दिले होते.
त्यांनंतर पावसाळा तोंडावर असल्याने पुढील अनेक समस्यांना या नुकसानग्रस्त कुटुंबाना तोंड द्यावे लागू शकते . म्हणूनच जिजाऊ संघटनेच्या वतीने वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडून नुकसान झालेल्या ग्रामस्थांना १०० पत्रे वाटप करण्यात आले. तसेच अंगावर पत्रे पडून जखमी झालेल्या दोन कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी नुकसग्रस्त कुटुंबीयांनी जिजाऊ संस्थेचे आभार व्यक्त केले.
याआधीही एक आठवडयापुर्वी भिवंडी तालुक्यातील ५ गावांतील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना घरावरील एकूण ३५० पत्रे वाटप करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी किमान अश्या आपत्तीच्यावेळी तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी लोकांना वाऱ्यावर सोडू नये असे सांगत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment