Thursday, 15 June 2023

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचा ६४ वा वर्धापनदिन व शाळा प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा !!

पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचा ६४ वा वर्धापनदिन व शाळा प्रवेशोत्सव मोठया उत्साहात साजरा !!

भिवंडी/ठाणे (ऑनलाईन वृत्तसेवा) दि.१५ : भिवंडी शहरातील मराठी माध्यमातील सर्वात मोठे विद्यालय म्हणून ओळख असलेल्या पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयाचा ६४ वा वर्धापनदिन व २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात नविन प्रवेश घेतलेल्या व जुन्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात तुताऱ्या, लेझीम व ढोल ताशाच्या गजरात साजरा करण्यात आला. उपस्थित शिक्षिकांनी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण व पुष्पवृष्टी करुन शाळेत स्वागत केले. 
वर्धापनदिन सोहळ्याकरीता निलीमा डावखरे ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून तर संस्थाध्यक्ष विजय जाधव हे समारंभाध्यक्ष म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सरचिटणीस आर.एन. पिंजारी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर घागस यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत केले तसेच विद्यालयाचा ६४ वर्षांचा इतिहास सुधीर घागस यांनी डॉक्यूमेंट्रीच्या स्वरुपात उपस्थितांसमोर मांडला. याप्रसंगी बोलताना निलिमा डावखरे यांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले तर व्हिडीओत एक छोटी कथा दाखवून विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. संस्थाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पद्मश्री अण्णासाहेबांनी सुरु केलेले हे शैक्षणिक कार्य आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचे आहे असे सांगितले.

वर्धापनदिन व शाळा प्रवेशोत्सव समारंभाचे सुत्रसंचालन संगिता जाधव यांनी केले तर उपमुख्याध्यापक आर.एस. शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील ज्ञानेश्वर गोसावी, विजय मोरे, राहूल पाटील, मिलींद पाटील, प्रदिप पाटील, फिरोजा पिंजारी, सतिश कनकुंटला, आर.एच.जाधव, संजय काकडे आदी शिक्षकांनी मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका !

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका ! ** उरणमध्ये भाजपच्या स्थानिक नेतृत्वा ...