Tuesday, 6 June 2023

कल्याण पंचायत समितीमध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा, लेझीम, भगवेफेटे, ऐतिहासिक ज्ञानामुळे वातावरण शिवमय !

कल्याण पंचायत समितीमध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा, लेझीम, भगवेफेटे, ऐतिहासिक ज्ञानामुळे वातावरण शिवमय !

कल्याण, (संजय कांबळे) : बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, अंखड भारतीयांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवस्वराज्य दिन कल्याण पंचायत समितीच्या वतीने मोठ्या उत्साहाने लेझीम, भगवेफेटे, अश्या मंगलमय व आंनदी वातावरण साजरा करण्यात आला. यावेळी जयभवानी, जय शिवाजी, शिवस्वराज्य दिनाचा विजय असो अश्या घोषणांनी पंचायत समिती परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने बळीराजाला भात बियाणाचे वाटपही गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या हस्ते करण्यात आले.

कल्याण पंचायत समिती नेहमीच शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात आघाडीवर असते,त्याप्रमाणे विविध प्रकारचे सण,उत्सव,यातही समितीचा पुढाकार असतो, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज शिवस्वराज्य दिन असाच मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

प्रथम गटविकास अधिकारी अशोक भवारी, यांच्या हस्ते दिप प्रज्वलन,शिवप्रतिमा पूजन, आणि शिवस्वराज्य गुढी उभारुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. बांधकाम विभागाचे उप अभियंता, सुदाम महाडिक, गटशिक्षणाधिकारी डॉ रुपाली खोमने, पशुसंवर्धन अधिकारी, डॉ धनंजय मादाळे, पाणी पुरवठा उप अभियंता, आशिष कटारे आदी विभागाचे प्रमुख, विस्तार अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

यानंतर राज्यगीत व राष्ट्र गीत झाल्यानंतर जिपशाळा फळेगाव या शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम चा ठेका धरला आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी वातावरण शिवमय केले, शिवध्वजासमोर व सभागृहात जांभूळ बिटाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मनमोहक रांगोळी काढली होती. त्यामुळे अधिक भर पडली.

सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमात घोटस ई व हेदूटणे जिप शाळेतील मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर भाषण, गाणी व पोवाडे सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली, यानंतर पंचायत समितीचे कुंटूब प्रमुख तथा गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी छत्रपतींची शासन व्यवस्था, दूरदृष्टी याची माहिती दिली, ते म्हणाले, राज्यात त्याकाळी सर्व पातशाह्याचा एकछत्री अंमल होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा किल्ला जिंकून लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवली, आपल्या राज्यात अष्टप्रधानमंडळ तयार करून त्यांच्या सल्याने कारभार केला, सदैव रयतेच्या हिताचा विचार केला. असे सांगत शिवरायांचे आठवावे रुप, आठवावा प्रताप, यातून आपल्या सेवेत काही जनहितार्थ समावेश केला तर आजचा शिवस्वराज्य दिन यशस्वी झाला असे म्हणता येईल असे ते म्हणाले.

आजच्या शिवस्वराज्य दिनाचे उत्कृष्टपणे नियोजन, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, सुंदर केल्याबद्दल बांधकाम विभागाचे, उप अभियंता, शाखा अभियंता,  कर्मचारी, महिला अधिकारी, तसेच प्रवीण माळोदे त्यांचे सहकारी, शिपाई राहुल कांबळे व त्यांचे सहकारी आदी सर्वाचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

याप्रसंगी कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने आजच्या शिवस्वराज्य दिनानिमित्त वेहेळे येथील शेतकऱ्यांना  गटविकास अधिकारी व पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते भात बियाणांचे वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कौतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...