मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीने शिवस्वराज्य दिनानिमित्त दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा केला गौरव !!
कल्याण, (संजय कांबळे) : प्रसिद्ध माळशेज घाटाच्या कुशीत वसलेल्या आणि मुरबाड पंचायत समितीच्या अंतर्गत येत असलेल्या शंभर टक्के आदीवासी ग्रामपंचायत म्हणून व विकास कामांच्या बाबतीत नावारूपाला येत असलेल्या फांगुळगव्हाण ग्रामपंचायतीने आजच्या शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून परिसरातील इयता १० व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५५ विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीचा यथोचित गौरव केला व वेगळ्या पध्दतीने शिवस्वराज्य दिन साजरा केला.
कल्याण नगर महामार्गावर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माळशेज घाटाच्या कुशीत फांगुळगव्हाण ग्रामपंचायत वसलेली आहे, ५/६ वाड्या पाड्याची मिळून ही ग्रामपंचायत स्थापन झाली असून गेली कित्येक वर्षांपासून मुलभूत सोईसुविधा पासून ही गावे वंचित राहिली होती. मात्र आता रस्ते, लाईट, शिक्षण, आरोग्य, अश्या सोईसुविधा मिळू लागल्या आहेत. नुकताच आंबेमाळी गावाला रस्ता मिळाला आहे.
या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळू कोकणे हे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुरबाड पंचायत समितीचे गटविकास यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास करु लागले आहेत. या गावात १०० टक्के आदिवासी समाज राहत असून सरपंच, उपसरपंच, सदस्य, हेच आहेत. या सर्वांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीचा कारभार करत आहे.
आजचा ६ जून २०२३ हा शिवस्वराज्य दिन साजरा करताना प्रथम सरपंच श्रीमती सविता रवींद्र भला यांच्या हस्ते गुढी उभारुन शिवप्रतिमा पूजन करण्यात आले. यानंतर इयत्ता १० मध्ये उत्तीर्ण झालेल्या ३४ तर इयत्ता १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या २१ मुला मुलींचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सरपंच सविता भला, उपसरपंच राजू भला,सदस्य मनिषा कारभळ, लक्ष्मी भला, तानाजी भला, दगडाबाई खाकर, विमल पोकळा, विठ्ठल भला, पांडुरंग साबळे, मंदा सांगडे, ग्रामसेवक बाळू कोकणे, याशिवाय किरण कारभळ, सोनू पोकळा, प्रकाश खाकर, शंकर भला, बाळू साबळे, आदी मंडळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment