Thursday, 22 June 2023

मंडल अधिकारी लक्ष्मण पवार यांना सिपीसी तरतुदी नुसार नोटीस !!

मंडल अधिकारी लक्ष्मण पवार यांना सिपीसी तरतुदी नुसार नोटीस !!

कल्याण,'(संजय कांबळे) : एका फेरफार नोंदी प्रकरणी शहापूर तहसीलदार अधिक पाटील यांनी दिलेले आदेश, जिल्हाधिकारी यांनी, ठरवून दिलेले मापदंड, याशिवाय शासनाचे परिपत्रक आदी बाबी असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पक्षकाराला फायदा होण्यासाठी यांचे उल्लंघन करणाऱ्या म्हारळ बु चे मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांना सिपीसी च्या तरतुदी नुसार नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे गरजेचे आहे.

शहापूर तहसीलदार अधिक पाटील यांनी हनो, विग्रप्र,एस आर ३०/२०२२ फेरफार क्र. २५१० बाबतीत आदेश दिले होते. ते देताना हरकतदार १,२ यांनी दाखल केलेल्या हरकती अमान्य करण्यात आले आहेत, रायते येथील नोंद मंजूर,असे ८ आदेश देण्यात आले होते. यामध्ये या आदेशाविरुध्द उपविभागीय अधिकारी यांच्या कडे अपिल दाखल करायचे असल्यास ६० दिवसांच्या आत करावे असे म्हटलं असताना, याबाबत तत्कालीन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घालून दिलेले मापदंड व निर्देश, शिवाय शासनाचे याबाबतचे परिपत्रक या सर्वाकडे दुर्लक्ष करून केवळ पक्षकाराला मदत व्हावी, म्हारळ बु चे मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी ही आदेशाचे पत्र मिळाल्यापासून ८ दिवसांत आपण अपिल केले आहे किंवा कसे हे कळवावे तसे न केल्यास या प्रकरणी आपणास काही एक स्वारस्य नसल्याचे समजण्यात येवून पुढील कारवाई करण्यात येईल असे पत्र शंकरलाल सोनी यांना पाठवले आहे. त्यामुळे याविषयी मंडळ अधिकारी ऐवढी घाई का करतात, यामध्ये काही आर्थिक हित आहे का ? असा संशय व्यक्त करुन अँड. आमित दातार यांनी मंडळ अधिकारी पवार यांना सिपीसी तरतुदी नुसार नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २५० मध्ये मुदतीची तरतूद असून १९६३ मधील कलम ५ व्दारे मुदत वाढवून घेता येते. असे असताना स्वतःच्या अधिकारात पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य, बेकायदेशीर पत्र देण्याचे कारण काय ? तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कडिल परिपत्रक व दिशानिर्देश यांचे उल्लंघन, कलम ८४क अंतर्गत दावा न्यायिक कार्यवाही वर प्रंलबित आहे. आदी ११ मुद्दे या नोटीस मध्ये दिलेले आहेत. 

त्यामुळे भविष्यात मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार काय भूमिका घेतात व त्यांचेवर काय कारवाई होते हे समजेलच,

No comments:

Post a Comment

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई !

प्रजासत्ताक दिनानिमित्त विमला तलाव गार्डन मध्ये साफसफाई ! ** हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची सुरुवात. उरण दि २७, (विठ्ठल ममता...