Monday, 12 June 2023

आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान तर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान संपन्न !

आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान तर्फे किल्ले रायगडावर स्वच्छता अभियान संपन्न !

महाड, गणेश नवघरे : तिथीनुसार आणि तारखेनुसार झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळा वेळी लाखो शिवसेवक दुर्गराज किल्ले रायगडावर आले होते आणि किल्यावर प्रचंड प्रमाणात कचरा झाला होता. त्यासाठी संघटनेच्या वतीने किल्ले रायगड दर्शन आणि स्वच्छता अभियान रविवार दिनांक ११/०६/२०२३ रोजी राबविण्यात आले. किल्ले रायगडावर महाराजांचे आणि जगदीश्वराचे दर्शन घेवून पायरी मार्गावरून स्वच्छता अभियानाला सुरवात केली. यावेळी सुमारे ८० ते ९० पोती कचरा जमा करून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्यात आली. 

या अभियानात संघटनेचे संस्थापक मनोज पवार, अध्यक्ष मंगेश गोविंद मोरे, उपाध्यक्ष मच्छीद्र श्रीखंडे, सेक्रेटरी शिवाजी पार्टे, खजिनदार नितेश चव्हाण तसेच संघटनेच्या एकूण ६० शिवसेवक,महिला शिवसेविका आणि विद्यार्थी शिवसेवक ठाणे, कल्याण, उल्हासनगर, वांगणी, बदलापुर आणि अंबरनाथ येथील शिवसेवकांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियान पार पाडण्यासाठी महाड येथील प्रांत अधिकारी सौ.पुदलवाड मॅडम यांनी संघटनेच्या सर्व शिवसेवकांना रोपवेची सुविधा मोफत करून दिली.तसेच किल्ले रायगड रोपवेचे श्री.राजेंद्र खातू साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही स्वच्छता मोहीम यशस्वी झाली. संघटनेतर्फे सर्वांचे आभार मानण्यात आले.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...