भाजप केंद्र सरकार च्या विरोधामध्ये आम आदमी पार्टी डोंबिवली पूर्व इंदिरा चौक येथे निदर्शने !!
डोंबिवली, प्रतिनिधी : दिल्ली सरकार लोक तांत्रिक पद्धतीने निवडून आलेले असताना केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी लोक तांत्रिक पद्धतीने काम करून न देता देशामध्ये न्यायपालिकेचा चुराडा करून व संविधानाचा अनादर करून केंद्र सरकार मनमानी हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवण्याचा प्रयत्न करत आहे त्या कारभाराच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या डोंबिवली कमिटी च्या वतीने आज 11 जून 2023 रविवार रोजी सकाळी 10.30 इंदिरा चौक, डोंबिवली पूर्व येथे निदर्शने करण्यात आले. दिल्लीत लोकशाही पद्धतीने प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या “ आप ” सरकारला कायदे बनवण्याचा आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला नकार देणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या अध्यादेशा विरोधात हे आंदोलन होते.
यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या निदर्शनामध्ये सहभाग घेतला. ठाणे जिल्हाध्यक्ष मुरारीलाल पचौरी, धुरिया जी, चिराग हरिया , धनंजय जोगदंड, आम आदमी पार्टी डोंबिवली अध्यक्ष विनोद गुप्ता, महिला अध्यक्ष अक्षरा पटेल, महिला उपाध्यक्ष रेखा रेडकर, मीडिया अध्यक्ष दीपक दुबे, सचिव सुनील वेंगुर्लेकर, युवा समितीचे दानिश पठान, उदय राऊल, दीपक रुके, राजेश शेलार, राजेश चौरसिया, मोहन भालेराव व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment