भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्या वर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप !
*बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या चौकशीची मागणी*
डोंबिवली, प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज (रविवारी) डोंबिवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली. डोंबिवली भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा पोलीसांनी दाखल केल्याचा आरोप करत भाजपने मानपाडाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी केली आहे.
राजकीय वरदहस्तामुळे भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी केली तरी बागडे यांची बदली न होता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने भाजपचा रोष वाढताना दिसत आहे.
भाजपाने पत्रकार परिषद घेत वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती दिली. या मालमत्तेची कागदपत्रे ईडी, सीबीआय संबंधित विभागाकडे पाठविली जाणार असून याची चौकशी व्हावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. एका वरिष्ठ पोलिस निरिक्षकाकडे एवढी मालमत्ता कशी येते याची माहिती मिळाली पाहीजे. त्यासाठी या मालमत्ते संदर्भात ईडी, सीबीआयची चौकशी झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज (रविवारी) डोंबिवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले, माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर राहुल दामले, नंदू परब आदि पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment