गावच्या विकासासाठी मतांच राजकारण न करता निधी उपलब्ध करणार, रायते येथील सर्व पक्षीय बैठकीत आमदार किसन कथोरे यांचे प्रतिपादन !!
कल्याण, नारायण सुरोशी : रायते येथे ग्रामस्थांनच्या वतीने विकास कामांच्या दुष्टीने, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,यात प्रामुख्याने मुंबई वरोडरा (बरोडा) मार्गात खुप मोठया प्रमाणात भराव झाल्यामुळे रायते व आसपासच्या गावांना पुराचं धोका निर्माण झाला आहे याबाबत काय उपाययोजना करता येतील तसेच एम.एम.आर डी. (MMRDA) अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची कामे , स्मशान भुमी, नदीकाठी घाट, ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत निधी,व्ययाम शाळा, मंडळ अधिकारी कार्यलय, गुरुचरण जागेवर विविध शासकीय योजना राबवण्या याव्या अशी मागणी ग्रामस्थांन कडुन करण्यात आली यावेळी आमदार किसन कथोरे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की आपल्याकडून लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून माझ्या कडे पाठवा गावाच्या विकासाठी मी मतांच राजकारण न करता लगेच निधी उपलब्ध करून देतो.
यावेळी त्यांनी अनेक अधीकारी वर्गाला फोन करून लकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना केल्या,यात सकारात्मक चर्चा होऊन, सर्वांच्या वतीने आमदार किसन कथोरे यांचे आभार मान्यत आले ,या बैठकीला मा.आमदार किसन कथोरे, कल्याण बाजार समितीचे संचालक रवींद्र घोडविंदे, राष्ट्रवादी कल्याण ग्रामीणचे सरचिटणीस राम सुरोशी, उपसरपंच हरेश पवार, शिवसेना ठाकरे गट जिल्हा सन्मयक संतोषजी सुरोशी, तालुका काँग्रेस युवक अध्यक्ष, अमोल सुरोशी, शाखा प्रमुख, भास्कर टेम्भे, पत्रकार जैतु मुठोलकर, नारायण सुरोशी, वकील मनोज सुरोशी, विजय सुरोशी भगवान पवार, सुनील सुरोशी, मयूर सुरोशी, विलास सोनावले, श्रीकांत तारमले, गणेश सुरोशी, सुभाष जाधव, सुभाष सुरोशी, विशाल घावट, रामदास सुरोशी, रवी सुरोशी, अरुण पवार अनंता सुरोशी, शरद पवार, अविनाश सुरोशी, अनंता तारमले, दिलीप सुरोशी, उत्तम सुरोशी, तानाजी कोर, निखिल सुरोशी, रमेश सुरोशी, रोशन जाधव, रवींद्र सुरोशी, वसंत सुरोशी, मनोज देऊ सुरोशी, गगे भाऊसाहेब, ग्रामसेवक ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, सर्व पक्षीय कार्यकर्ते, आसपासच्या गावातील कार्यकते मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment