आदर्श मानव सेवा सांस्कृतिक फाऊंडेशन, तसेच राष्ट्रीय पत्रकार महासभा" यांच्या संयुक्त विद्यमाने व्हील चेअर मदत देण्याचा कार्यक्रमाचे आयोजन !!
कल्याण, नारायण सुरोशी : विठ्ठलवाडी येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे १० जून रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजता आदर्श मानव सेवा सांस्कृतिक फाऊंडेशन, तसेच राष्ट्रीय पत्रकार महासभा" यांच्या संयुक्त विद्यमाने व्हील चेअर मदत देण्याचा कार्यक्रम पार पडला, यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ महिला इंदूताई अंजनकर यांना वसईचे स्थानिक समाज सेवक डॉ. विजय रामचंद्र पाटील यांच्या हस्ते व्हील चेअर चा आधार देण्यात आला. या कार्यक्रमाला डॉ. विजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित राहिले होते. पंचमुखी हनुमान मंदिर चे पुजारी पंडित प्रवेश शर्मा हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहून, योगदान दिले. तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी डोंबिवलीचे स्थानिक समाज सेवक सुरेश ओगले यांनी ज्येष्ठ महिला इंदूताई यांना सुगंधी अगरबत्तीचे पाकिटे देवून स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी आधार दिला.
या विशेष कार्यक्रमाचे निवेदन शेतकरी संघटनेचे मधुकर वाल्हेकर यांनी केले. कार्यक्रमाला हनुमान मंदिराच्या फुलवाली जयश्री नायर, अपर्णा पटनाईक, मोहित पटनाईक तसेच पंचमुखी हनुमान मंदिराच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची बहु गर्दी लाभली होती.
No comments:
Post a Comment