महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांना लाच घेताना सीबीआय कडून अटक !!
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील एका आयएएस अधिकाऱ्यावर सीबीआयने छापा टाकला आहे. पुण्यात हे अधिकारी महसुल विभागात कार्यरत होते. लाच स्वीकारत असताना सीबीआयने ही कारवाई केली आहे. अनिल रामोड असे या आयएएस अधिकाऱ्याचे नाव असून ते अतिरिक्त महसूल विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
महामार्गालगत असलेल्या जमीनीच्या व्यवहारासाठी अनिल रामोड हे आठ लाख रुपयांची लाच स्वीकारत होते. यावेळी सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडले. सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. सीबीआयचे डीआयजी सुधीर हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईनंतर दुपारी 'सीबीआय'ने रामोड यांचे महसूल विभागातील कार्यालय तसेच सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील 'ऋतुपर्ण' सोसायटी या खासगी निवासस्थानीही छापा टाकला आहे. रामोड हे मूळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अतिरिक्त विभागीय आयुक्त आहेत. पुण्यासारख्या शहरात एवढी मोठा कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. तसेच एवढे मोठे अधिकारी थेट लाच घेताना अटक होत असल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. केंद्रीय एजन्सीने त्याच्या मालमत्तेवर छापे टाकताना 6 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली, असे सीबीआयने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment