Friday, 9 June 2023

शिवसेनेच्या वतिने अल्प दरात संगणक प्रशिक्षणाचे शुभारंभ...

शिवसेनेच्या वतिने अल्प दरात संगणक प्रशिक्षणाचे शुभारंभ...

वसई, प्रतिनिधी : महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या प्रयत्नातुन नालासोपारा वसई विरार मधिल विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात संगणक प्रशिक्षणाचे शुभारंभ करण्यात आले.

विद्यार्थ्यानी संगणक साक्षर होऊन आजच्या डिजिटल युगात सक्षम व्हावे याहेतुने सामाजिक कार्य म्हणुन संगणकाचे शिक्षण घेणे आता गरजेचे झाले आहे. यावेळी अनेक विद्यार्थ्यानी ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन केले आहे.

शुभारंभ प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख निलेश तेंडोलकर साहेब, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी, उपतालुकाप्रमुख अजितभाऊ खांबे, उपतालुकाप्रमुख अतुल पाटील महिला उपतालुका संघटक दिपाली राणे, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, महिला आघाडी उपशहर संघटक सोनल ठाकूर तसेच शहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महिला संघटक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ; ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कोतुक सन्मान !!

पत्रकारिता, निवेदन व समाजकार्याचा मानबिंदू ;  ठाण्यात लक्ष्मीकांत पोपळे यांचा कोतुक सन्मान !! ठाणे प्रतिनिधी: ता.३, पत्रकारिता, ...