Wednesday 28 June 2023

जिजाऊ संस्थेच्या ब्युटी पार्लर स्पर्धेला नालासोपारात महिलांचा प्रतिसाद....

जिजाऊ  संस्थेच्या  ब्युटी पार्लर स्पर्धेला नालासोपारात  महिलांचा प्रतिसाद....

वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारा शहरात प्रथमच ब्युटी पार्लर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मीनाक्षी कोंडकर, व्दितीय क्रमांक तन्वी हडशी, तृतीय क्रमांक अनिता वर्मा यांनी क्रमांक पटकविले.

सौदर्य स्पर्धा या महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे या स्पर्धा म्हणजे केवळ सौदर्यावर आधारीत नसतात तर इथे बुध्दिमत्तेचाही कस लागतो. स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर महिलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना स्वतःला सिध्द करण्याची प्रेरणा मिळते. महिलांनी स्वावलंबी होऊन व्यवसायकपुरक दृष्टीकोन ठेवावा आणि सक्षमपणे काम करून आपल्या पायावर उभे रहावे या उद्देशाने अधिकाधिक महिलांना सर्व प्रकारचे मोफत प्रशिक्षण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून देण्यात येते.

अनेक महिला घरकामात गुंतलेल्या असतात त्यांना आर्थिकदृष्टया पतीवर अवलंबुन रहावे लागते या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण च्या माध्यमातुन महिलांसाठी  हक्काचे व्यसपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये मेहंदी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवणकला प्रशिक्षण, अगरबत्ती निरमा पावडर प्रशिक्षण, मोफत देण्यात येते.

ब्युटी पार्लर स्पर्धेतील विजेत्यांना जिजाऊ संस्थेचा तालुकाप्रमुख हर्षालीताई खानविलकर, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक संगिता पासी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...