कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, चारही नद्या दुथडी, म्हारळ मध्ये काही भागात पाणी, वरपमध्ये खड्याला तलावाचे स्वरूप, शाळकरी मुलांचे हाल !
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन तीन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील उल्हास, भातास, काळू आणि बारवी अशा चारही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. म्हारळ गावातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे तर वरपमध्ये बिल्डर्स मंडळींनी खोदून ठेवलेल्या १५/२० फुट खड्याल तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या घरे व सरक्षंक भिंतीना धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे शाळकरी मुलांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागत होते.
कल्याण तालुक्यात गेल्या २/३ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील उल्हास, भातसा, काळू आणि बारवी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत, कल्याण नगर मार्गावरील रायते येथील उल्हास नदीवर असलेल्या पुलाच्या कमानीला पाणी लागले आहे. काळु व बारवी नदीवर देखील अशीच अवस्था झाली आहे. तालुक्यातील बंधारे, झरे ओसंडून वाहत आहेत. म्हारळ गावातील बोडके चाळ, आण्णासाहेब पाटील नगर, शिवानी नगर, प्रिती अँकेडमी शाळा आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. वरपमध्ये बिल्डर मंडळी नी खोदून ठेवलेल्या १५/२० फुट खड्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे, यामुळे ओससाईबाबानगर येथील पत्रकार संजय कांबळे यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. तसेच घराच्या बाजूला असलेली सरक्षंक भिंत कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल सिंमेट काँक्रीटीकरण चे काम पुर्ण न झाल्याने जागोजागी खड्डे, तसेच सर्व पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. खड्यामुळे अपघात व वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाऊस सतत चालू राहिला तर मात्र पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
No comments:
Post a Comment