Tuesday, 18 July 2023

पत्रकार सुभाष पटनाईक यांना दिल्लीत "बेस्ट एचीव्हअर्स अवॉर्ड"ने सन्मान...!

पत्रकार सुभाष पटनाईक यांना दिल्लीत "बेस्ट एचीव्हअर्स अवॉर्ड"ने सन्मान...!

       *कल्याण -(खास प्रतिनिधी)*
 *कल्याण चे स्थानिक निर्भिड पत्रकार सुभाष द.पटनाईक यांना दिल्ली येथील ' मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड ' या राष्ट्रीय उच्च संस्थेच्या वतीने  " बेस्ट एचीव्हअर्स अवॉर्ड " ने विशेष सन्मान करण्यात आल्याने सुभाष पटनाईक यांचे नातेवाईक व मित्रपरिवार तर्फे फार कौतुक केले जात आहे.एप्रिल महिन्यात सुभाष पटनाईक यांना दिल्ली येथे 'बेस्ट जर्नलिझम अवॉर्ड' ने विशेष सन्मानित करण्यात आले होते.या पुर्वी ही पत्रकार सुभाष पटनाईक यांना विविध संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.*

         *पत्रकार सुभाष द.पटनाईक यांचे सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात गेली २५ वर्ष हिंदी-मराठी द्वी भाषेतील वृत्तपत्र आणि न्युज चॅनल मध्ये उल्लेखनीय कार्य सुरू आहे. बेधडक लेखणीच्या माध्यमातून अनेक पीडितांना न्याय मिळून देत असून,सतत पत्रकारिता आणि सामाजिक सेवा कार्यात कार्यक्षम आहेत.त्यांच्या ह्या सामाजिक सेवा कार्याबद्दल दिल्ली,फरिदाबाद येथील 'क्रस्टल आर्ट ऑफ थिएटर'या सभागृहात "मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड" या उच्च स्थरिय राष्ट्रीय संस्थेच्या वतीने १४ जुलै रोजी पत्रकार सुभाष पटनाईक यांना 'मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड' चे सर्वेसर्वा,चेअरमन सी.पी.यादव यांच्या हस्ते पुन्हा "बेस्ट एचीव्हर्स अवॉर्ड" ने सन्मान करण्यात आला**

       *पत्रकार सुभाष द.पटनाईक यांना गेल्या २५ वर्षात अनेक सामाजिक संस्थेच्या वतीने राज्य स्थरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान दिल्ली, फरिदबाद येथे  एप्रिल २०२३ रोजी पत्रकार सुभाष द.पटनाईक यांना मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड या उच्च स्थारिय राष्ट्रीय संस्थेच्या वतीने "बेस्ट जर्नलिझम अवॉर्ड " देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.*

         *दरम्यान पत्रकार सुभाष द.पटनाईक यांचे विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य पाहून पुन्हा दिल्ली येथे' मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड च्या' पदाधिकारी पूजा यादव यांनी निवड केल्याने संस्थेचे मुख्य चेअरमन सी.पी.यादव यांनी पत्रकार सुभाष द.पटनाईक यांना " बेस्ट एचीव्हर्स अवॉर्ड " घोषित करून,कार्यक्रमाच्या वेळी स्मृती चिन्ह व प्रमाणपत्रासहीत  उपस्थितीत मान्यवर मेव्हाड युनिव्हर्ससीटीचे संचालक डॉ.सुरेंद्र रोहेल्ला व मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड चे चेअरमन सी.पी.यादव यांच्या शुभ हस्ते अवॉर्ड बहाल करून,विशेष सन्मान करण्यात आला.*

No comments:

Post a Comment

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !!

पर्यावरण व मानव–वन्यजीव संघर्ष या विषयांवर जनजागृती !! उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : पोसरी ठाकूरवाडी येथील रायगड जिल्हा प्राथमि...