व्हाँइस आँफ मिडीयाच्या मुरबाड तालुका अध्यक्ष पदी दै.ठाणे वैभवाचे पत्रकार मंगल डोंगरे यांची निवड !!
मुरबाड, ( प्रतिनिधी ) :: संपूर्ण देशभरात "लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा" हे ब्रिद घेऊन पत्रकारांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या **व्हाँइस आँफ मिडीया** या राष्ट्रीय संघटनेचे काल रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यात कोकणस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय संदिपजी काळे साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.श्री. अनिलजी म्हस्के, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव मा.कु.दिव्या भोसले, राष्ट्रीय प्रवक्ते मा.श्री. नरेशजी जाधव, फिरोज पिंजारी राष्ट्रीय उपाध्यक्ष, कोकण विभागिय अध्यक्ष प्रविण कोळआपटे, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गंगावणे, पालघर जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, ठाणे जिल्हाध्यक्ष मा.श्री. अरुणजी ठोंबरे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विजय गावकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळु कोकाटे,यांसह अनेक दिग्गज पत्रकार यावेळी उपस्थित होते.
खरेतर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. हे सर्वजण मानतात, आज पत्रकारितेमुळेच भारतीय लोकशाही टिकून आहे. ज्या लेखनीमुळे रंकाचा राव होतो आणि रावाचा रंक 'हि ताकद फक्त आणि फक्त लेखणीत आहे. मात्र या क्षेत्रात वेगवेगळ्या व्रुत्तपत्रात, तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काम करणारा पत्रकार स्वतःच्या विकासापासून कोसोमैल दुर आणि दुर्लक्षित राहिला आहे. आणि म्हणूनच देशभरातून पत्रकारांचा आवाज बनुन पत्रकारांच्या मागे मानसिक आधार होऊन, त्यांच्या मागे उभे राहण्यासाठी काही जुनी-जाणकार आणि तज्ञ मंडळी एकत्र येऊन **Voice Of Media** ची स्थापना झाली. आणि पत्रकारिता क्षेत्रात १२४ वी संघटना उदयास आली. आजमितीस देशभरात पत्रकारांच्या 123 संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असुन, अवघ्या दोन वर्षांपूर्वी Voice Of Media ''या संघटनेची स्थापना झाली. आणि पाहता -पाहता देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातुन एकोणतीस हजार पत्रकार सभासद या संघटनेशी जोडले गेले. आणि संघटनेची घोडदौड सुरु झाली आणि नंबर १ ची राष्ट्रीय संघटना म्हणून संघटनेने नावलौकिक केले. ह्या संघटनेने आपले ध्येय, उद्दिष्ट नक्की करून पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांचा विकास साधणे ठरविल्याने संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या उज्वल भविष्यासाठी जोरकसपणे काम उभे करून, पत्रकारांच्या कुटुंबियांचे आशिर्वाद घेऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारी एक संघटना असुन, त्यांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली असुन, आतापर्यंत साडेपाच हजार पत्रकारांना मोफत दहा लाख रुपयांचा विमा देण्यात आला आहे. तर शासना कडुन मिळणाऱ्या सेवानिवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. तसेच भविष्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्याची मागणी केली आहे. त्यात फेलोशिप योजना, पत्रकारांसाठी घरे, तालुक्याच्या -शहराच्या ठिकाणी पत्रकार भवन, अशा विविध योजनांवर संघटनेच्या वेगवेगळ्या विंग कार्यरत आहेत. त्यामुळे आता पत्रकारांनी पत्रकारांसाठी लढायचे असल्यामुळे संघटना झपाट्याने अधिकाधिक मजबूत करून आपले हित साधावयाचे आहे. म्हणून आजच्या या संमेलनात रायगड, ठाणे,पालघर जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यांत आल्या. यामध्ये मुरबाड तालुका अध्यक्षपदी दैनिक ठाणे वैभवचे पत्रकार श्री. मंगल डोंगरे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. हि नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष संदिपजी काळे, प्रदेश अध्यक्ष अनिलजी म्हस्के, ठाणे जिल्हाध्यक्ष अरुणजी ठोंबरे, तसेच खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. सुनिलजी पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन, तसेच जेष्ठ पत्रकार म्हणून सन्मान चिन्ह, शाल,पुष्पगुच्छ देत संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी नियुक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment