आपटी गावाचा रस्ता पाण्याखाली, दहागांव पुलावर लवकरच पाणी, पाऊस सुरू राहिल्यास कल्याण नगरमार्ग बंद होण्याची शक्यता?
कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन दिवसापासून पडणा-या मुसळधार पावसामुळे रायते आपटी हा रस्ता पाण्याखाली गेला असून यामुळे आपटी बा-हे व आपटी चोण गावाचा संपर्क तुटला आहे. तर रायते बदलापूर मार्गावरील दहागांव पुलावर लवकरच पाणी येवू शकते, शिवाय पाऊस असाच सुरू राहिला तर उल्हास नदीवर असलेला रायता पुल देखील पाण्याखाली जाऊन कल्याण नगर मार्ग ठप्प होऊ शकतो.
तालुक्यातील सर्वत्र गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतो आहे, यामुळे उल्हास, भातसा, काळु आणि बारवी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यातील काळु व बारवी नदीवर असलेला रुंदा व दहागांव हे पुल कमी उंचीचे असल्याने ते लगेच पाण्याखाली जातात, तर उल्हास नदीवर रायता पुल हा अगदी शेवटी पाण्याखाली जातो, सध्या मुसळधार पावसामुळे रायते पुलाच्या सर्व कमानी बुडाल्या आहेत, त्यामुळे रायते आपटी रस्त्यावर अम्मू रिसार्ट जवळील मोरी पाण्याखाली जाऊन हा रस्ता आज सकाळी बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटला असून वाहनांची येजा थांबली आहे.
तर बारवी नदीवर चा पुल हा कमी उंचीचा असल्याने त्यावरही लवकरच पाणी भरून हा मार्ग बंद होऊ शकतो. काळू नदीच्या पुलाला पाणी लागले आहे,या पुलावर पाणी आले तर १०/१२ गावाचा रस्ता बंद होतो. विशेष म्हणजे रुंदा व खडवली येथील नदीवर असलेल्या पुलाचे सरक्षंक कटडे, खांब नसल्याने या पुलावर पाणी असल्यास त्यावरून वाहतूक करणे, येजा करणे धोकादायक ठरू शकते.
कल्याण नगर मार्गावर असलेल्या रायते पुलावर सध्या तरी पाणी नाही, परंतु पांजरापोळ येथे पाणी भरत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होऊ शकते. शिवाय पाऊस सुरू राहिल्यास कल्याण नगर मार्ग बंद होऊ शकतो, या पावसामुळे अनेक गावात मात्र पाणी भरु लागले आहे.
No comments:
Post a Comment